IPL 2025 : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होण्यासाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. 22 मार्च रोजी ईडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सीजनचा पहिला सामना खेळवला जाणार असून सर्व चाहते नव्या सीजनसाठी उत्साहित आहेत. मागील वर्षी उपविजेता ठरलेला सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ यंदा 23 मार्च रोजी आयपीएल 2025 (IPL 2025) मधील पहिला सामना खेळेल. हैदराबाद संघ त्यांच्या होम ग्राउंडवर राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.
आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघ अतिशय मजबूत स्थितीत दिसत असून चाहते या संघाला आयपीएल 2025 मधील सर्वात मजबूत संघ म्हणत आहेत. आयपीएल 2024 मध्ये सुद्धा पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादने जबरदस्त कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर फायनलमध्ये त्यांचा सामना केकेआर सोबत झाला. परंतु यात दुर्दैवाने त्याने अपयश आले आणि सनरायजर्स हैदराबाद संघ पराभूत झाला. मात्र यंदा पुन्हा एकदा आयपीएलचे मैदान गाजवण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद सज्ज आहेत. त्यांच्या संघात अनेक मॅच विनर आणि टी20 स्पेशलिस्ट खेळाडू आहेत.
हेही वाचा : IPL 2025 साठी बीसीसीआयचे 10 विचित्र नियम, ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, नियम न पाळल्यास होणार कारवाई
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग 11 पाहिली तर यात अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड हे दोन्ही फलंदाज ओपनिंग करतील. तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशनचं खेळणं नक्की आहे. टॉप ऑर्डरमध्ये स्टार खेळाडूनंतर चौथ्या क्रमांकावर सुद्धा नितीश कुमार रेड्डी आणि पाचव्या नंबरवर विकेटकीपर हेनरिक क्लासेन उतरू शकतो. तर सहाव्या क्रमांकावर अभिनव मनोहर खेळू शकतो.
अभिनव मनोहर हा देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार फलंदाज असून सातव्या क्रमांकावर वियाम मुल्डरला संधी मिळू शकते. वियाम मुल्डर हे गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांमध्ये संघासाठी मॅच विनर बनू शकतो. सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजी अटॅकमध्ये मोहम्मद शमी, पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे. तर स्पिनर म्हणून राहुल चहर आणि एडम जम्पाचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे ही मजबूत संघ आयपीएल 2025 मध्ये भल्याभल्या संघांवर भारी पडणार हे जवळपास निश्चित आहे.
सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 : ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, वियान मुल्डर, पॅट कमिंस (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि राहुल चाहर.
इम्पॅक्ट खेळाडू - जयदेव उनादकट