Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

चेहऱ्यावर शांती आणि आनंद... धर्मशाळेहून वंदे भारत ट्रेनने सुरक्षित परतला पंजाब आणि दिल्लीचा संघ, खेळाडूंचा Video Viral

IPL 2025 दरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जच्या खेळाडूंना धर्मशाळेहून नवी दिल्लीला घेऊन येण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष वंदे भारत ट्रेनची व्यवस्था केली.

चेहऱ्यावर शांती आणि आनंद... धर्मशाळेहून वंदे भारत ट्रेनने सुरक्षित परतला पंजाब आणि दिल्लीचा संघ, खेळाडूंचा Video Viral

IPL 2025: धर्मशाळा येथे गेलेल्या लाईट्स आणि आजूबाजूला असलेला तणाव यामुळे धर्मशाळामध्ये सुरु असलेला सामान अचानक मध्येच रद्द करावा लागला. कारण पाकिस्तानने जम्मू विमानतळासह अनेक शहरांवर हल्ला केला होता. त्यानंतर आयपीएलमधील पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सांघाचे खेळाडूंना धर्मशाळाहून दिल्लीला सुरक्षितपणे आणण्यात आले आहे. संघातील खेळाडू, स्टाफ, सामना अधिकारी आणि प्रसारणाशी संबंधित सर्व लोकांना विशेष वंदे भारत ट्रेनने दिल्लीला आणण्यात आले. यावेळी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर शांती दिसून येत होती आणि त्यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. 

स्टेडियम अचानक झाला ब्लॅकआऊट 

8 मे रोजी धर्मशाळा येथे सुरु पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना थांबवण्यात आला. पहिल्या डावात फक्त 10.1 षटके खेळवण्यात आली तेव्हा स्टेडियम अचानक  ब्लॅकआऊट झाला आणि पुढे सामना रद्द करण्यात आला. त्यावेळी ताबडतोब स्टेडियममध्ये असलेल्या सर्व खेळाडू, स्टाफ आणि प्रेक्षकांना सुरीक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. पुढे  सुरक्षेच्या चिंता वाढू लागल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय रेल्वेशी समन्वय साधून खेळाडू, कर्मचारी, समालोचक आणि अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एक विशेष ट्रेनची व्यवस्था केली.

हे ही वाचा: रोहित पाठोपाठ विराट कोहलीही निवृत्तीच्या तयारीत; मात्र BCCI कडूनच होतोय विरोध

 

विशेष ट्रेनची व्यवस्था 

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर वाढत्या तणावामुळे 8 मे रोजी धर्मशाळा येथे होणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. पहिल्या डावात फक्त १०.१ षटके खेळवण्यात आली त्याच षटकात  सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ताबडतोब स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूंना आणि चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढण्यात आले. एयरपोर्ट बंद असल्याने नंतर सगळ्यांच्याय सुरक्षेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय रेल्वेशी समन्वय साधून एक निर्णय घातला. यानुसार बीसीसीआयने खेळाडू, कर्मचारी, समालोचक आणि अधिकाऱ्यांना धर्मशाळा  इथून बाहेर काढण्यासाठी एक विशेष ट्रेनची व्यवस्था केली. वंदे भारताच्या ट्रेनने सगळे दिल्लीला परतले. 

हे ही वाचा: Hardik Pandya: जवानाला बघून हार्दिक पांड्याने ठोकला सॅल्यूट, चाहत्यांचे जिंकले मन; Video Viral

 

पंजाब किंग्जने मानले आभार 

पंजाब किंग्जने पोस्ट करत आभार मानले. ऑफिशल अकाउंटवरून  X वर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'प्रत्येकाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्वरित कारवाई केल्याबद्दल सर्वांचे आभार.'

 

हे ही वाचा: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, 'या' ट्विटमुळे आला अडचणीत; नेटिझन्सने शिकवला धडा

आयपीएलला मिळाली एक आठवड्याची स्थगिती 

पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर सीमेवरील तणाव वाढला. यामुळे आता आयपीएलचा सामना होणार की नाही याची चर्चा सुरु झाली. अखेरीस 9 मेला  बीसीसीआयने घोषणा केली की ते आयपीएल तात्काळ प्रभावाने एका आठवड्यासाठी पुढे ढकलत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाण याबाबत अधिक माहिती योग्य वेळी दिली जाईल."

Read More