Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

काव्या मारनला करत होता ब्लॅकमेल, CID ने घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे प्रकरण?

IPL 2025 : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष  ए. जेगन मोहन राव यांना सीआयडीने अटक केली आहे. अध्यक्षांना झालेल्या या अटकेमुळे हैदराबाद क्रिकेटमध्ये गोंधळ उडालाय. 

काव्या मारनला करत होता ब्लॅकमेल, CID ने घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे प्रकरण?

IPL 2025 : इंडियन प्रिमीयर लीगबाबत एक मोठा वाद समोर आला आहे. हे प्रकरण सनरायजर्स हैदराबादशी जोडलेलं असून बुधवारी सीआयडीने आयपीएल 2025 संबंधित तिकीट घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष  ए. जेगन मोहन राव यांना सीआयडीने अटक केली आहे. अध्यक्षांना झालेल्या या अटकेमुळे हैदराबाद क्रिकेटमध्ये गोंधळ उडालाय. 

तिकीट घोटाळ्याप्रकरणी झाली अटक : 

तेलंगणा सीआयडीने 9 जुलैच्या रात्री हैदराबाद क्रिकेट संघाचे अध्यक्ष जगन मोहन राव आणि तीन इतर पदाधिकाऱ्यांना आयपीएल 2025 दरम्यान तिकीट घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

सनरायजर्स हैदराबाद संघाने आरोप लावला होता की, 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध सामन्याच्या काही तास आधी जगन मोहन रावने राजीव गांधी स्टेडियमवरील एक कॉर्पोरेट बॉक्स बंद केला होता आणि 20 अतिरिक्त पासची मागणी केली होती. हे HCA, फ्रेंचायझी आणि BCCI यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय कराराचे उल्लंघन आहे, ज्यानुसार संघाला 4000 कॉम्प्लिमेंट्री तिकिटं मिळतात. 

हेही वाचा : 'वैयक्तिक रेकॉर्डच्या मागे लागून...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं शुभमन गिलला जाहीर आव्हान, 'मला वाटत नाही त्याच्याकडे...'

 

काव्या मारनने केली होती तक्रार : 

तेलंगणा सीआयडीने संबंधित कारवाई सनरायजर्स हैदराबाद फ्रेंचायझीच्या तक्रारीवर केली होती. ज्यात सांगितलं गेलं होतं की, हैदराबाद क्रिकेट संघ हा फ्री तिकीटसाठी धमकावतो. या ब्लॅकमेलिंगला रोखण्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएल संचालन परिषदेकडून मदतीची मागणी करण्यात आलेली होती. नंतर या आरोपांवर कारवाई करत तेलंगणा सरकारने दक्षता चौकशीचे आदेश दिले आणि तपासानंतर सीआयडीने एफआयआर नोंदवला होता. 

मोहम्मद अजहरुद्दीन काय म्हणाला?

हे त्रासदायक आहे, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील चालू असलेल्या भ्रष्टाचार आणि तिकिट घोटाळ्यामुळे मी खूप नाराज आहे. जे खेळतात किंवा चालवतात त्यांच्यापेक्षा हा खेळ नेहमीच मोठा असतो. त्याने क्रिकेटसाठी काहीही केले नाही. ही समिती तसा कारभार करत नव्हती जसा एका अधिकाऱ्यांनी करायला हवा.  एवढंच नाही तर ते कोर्टाच्या आदेशांचा देखील आदर करत नव्हते. गेल्या वर्षी, तो लीग सामना न घेता साइट निवडत होते. हे लज्जास्पद आहे. 

Read More