KKR vs RCB IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सिजनची सुरुवात केकेआर विरुद्ध आरसीबी या सामन्याने झाली. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळला गेला आणि ज्यामध्ये आरसीबी संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आले. आरसीबी संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला केकेआर आक्रमक खेळ केला, परंतु त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत त्यांना 174 धावांपर्यंतच रोखले. यानंतर आरसीबीने अवघ्या 16.2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. ज्यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून 59 धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात कोहली फलंदाजी करत असताना अचानक त्याचा एक चाहता मैदानात घुसला.
या सामन्यात फिल सॉल्ट 56 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, कोहलीने संघाला विजयाकडे नेण्याची जबाबदारी स्वीकारली. विराटने या सामन्यात 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करताच स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेला त्याचा चाहता मैदानात घुसला. विराटला बघत तो खेळपट्टीच्या दिशेने धावला, कोहलीजवळ पोहोचला आणि नंतर त्याच्या पाया पडून गेला. यानंतर कोहलीने त्याला लगेच उचलले आणि तेवढ्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या चाहत्याला मैदानाबाहेर काढले. ही घटना आरसीबी संघाच्या डावाच्या 12.5 षटकांनंतर घडली.
हे ही वाचा: KKR चा घरच्या मैदानावर पराभव... IPL 2025 मध्ये RCB ची विजयी सुरुवात! कोहलीने मिळवला एकतर्फी विजय
Moment Of The Match
— Harsh 17 (@harsh03443) March 22, 2025
A Fan Branches Everything For Virat Kohli And Touches His Feet What A Madness As A Fan Pure Kattar Kolhi Supporter ..#ViratKohli | #KKRvRCB pic.twitter.com/6bcZ6eer3H
हे ही वाचा: IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये पंचांना किती पगार मिळतो? एका सिजनची कमाई ऐकून बसेल धक्का!
केकेआर विरुद्ध आरसीबी या सामन्यात आरसीबीने केवळ 16.2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. याआधी २०२४ साली गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबी संघाने अवघ्या 16 षटकांत 201 धावा केल्या होत्या, त्यात 24 चेंडू बाकी होते. आरसीबी टीमनं हा सामना केवळ 22 चेंडू राखून जिंकला.