Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL मध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी, सीबीआयकडून तिघांना अटक

एका बाजूला आयपीएलची रंगत सुरु असताना दुसऱ्या बाजूला मोठी बातमी समोर आली आहे.

IPL मध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी, सीबीआयकडून तिघांना अटक

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. तर उर्वरित 3 जागांसाठी मुंबई आणि चेन्नईचा अपवाद वगळता 7 संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळतेय. एका बाजूला आयपीएलची रंगत सुरु असताना दुसऱ्या बाजूला मोठी बातमी समोर आली आहे. (ipl cbi books 3 persons for allegedly match fixing and betting)

सीबीआयने सट्टेबाजी आणि फिक्सिंगप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तसेच 2 गुन्हे दाखल केले आहेत. हे 2019 सालचं प्रकरण आहे. सीबीआय या प्रकरणी देशातील आयपीएल सट्टेबाजी नेटवर्कची चौकशी करत आहे ज्याचा थेट संबंध पाकिस्तानशी आहे. या प्रकरणी अनेक शहरांमध्ये  अनेकांची चौकशी सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पाकिस्तानी संपर्कांच्या सांगण्यावरून आयपीएल सामन्यांच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तिंघाविरुद्ध गुन्हा नोंदवला. यानंतर सांगितले की पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीनुसार मॅच फिक्सिंग रॅकेटने आयपीएल सामन्यांच्या निकालावर कथितपणे प्रभाव टाकला.

Read More