IPL 2025: सोमवारी वानखेडे मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाराजी जाहीर केली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वातील बंगळुरु संघाने आधी चेन्नईचा चेपॉक मैदानात 17 वर्षांनी आणि आता मुंबईचा वानखेडे मैदानात 10 वर्षांनी पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 222 धावांचा पाठलाग करताना तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी स्फोटक फलंदाजी करत बंगळुरुच्या चिंता वाढवल्या होत्या. मात्र अखेर 12 धावांनी त्यांनी सामना गमावला.
सामन्यानंतर हार्दिकने म्हटलं की, "हा धावांचा एक मेळावाच होता. खेळपट्टी खूप चांगली होती. मी स्वत:शीच बोलत होतो की, पुम्हा एकदा दोन मोठे फटके खेळण्यात आम्ही कमी पडलो. मला फार काही बोलायचं नाही. ज्याप्रकारची खेळपट्टी होती, ते पाहता गोलंदाजांना फार काही लपवण्याची संधी नव्हती. आमची बांधणी नीट नव्हती. तुम्ही फलंदाजांना रोखू शकता, पण मी गोलंदाजांवर फार कठोर होणार नाही. ही फार आव्हानात्मक खेळपट्टी होती. तिसऱ्या क्रमांकासाठी आमच्याकडे फार पर्याय नव्हते. ठरलेल्या संघात नमन नेहमीच खालच्या क्रमांकावर खेळण्यास येतो".
रोहित शर्माने पहिले तीन सामने खेळताना 13 (चेन्नई सुपरकिंग्ज), 8 (गुजरात टायटन्स) आणि 0 (कोलकाता नाईट रायडर्स) धावा केल्या होत्या. यानंतर लखनऊविरोधातील सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. बंगळुरुविरोधातील सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आला होता. बंगळुरु फलंदाजी करत असताना 15 व्या ओव्हरमध्ये तो क्षेत्ररक्षणासाठी आला. यानंतर फलंदाजीसाठी आला असता, त्याने 9 चेंडूत 17 धावा केल्या आणि आऊट झाला.
रोहित शर्मासंदर्भात बोलताना हार्दिक म्हणाला की, "गेल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसल्याने आम्हाला त्याच्यासारखं चांगलं खेळणाऱ्या कोणाला तरी फलंदाजीसाठी वर पाठवायचं होतं. एकदा रोहित शर्मा परतला तेव्हा आम्हाला आता नमनला फलंदाजीसाठी खालच्या क्रममांकावर यावं लागेल याची कल्पना होती. तिलक खूप चांगला खेळला. गेल्या सामन्यात अनेक गोष्टी घडल्या. लोक त्याबद्दल खूप काही बोलले पण लोकांना माहित नाही की त्याने आदल्या त्याल जोरात चेंडू लागला होता. तो एक धोरणात्मक निर्णय होता, परंतु त्याच्या बोटामुळे, प्रशिक्षकांना असं वाटले की नवीन खेळाडूला खेळण्यास पाठवणं चांगला पर्याय आहे. आज, तो अद्भुत होता. या प्रकारच्या सामन्यात, पॉवरप्ले खूप महत्वाचे असतात. आम्ही मधल्या फळीत चांगली खेळी करु शकलो आणि त्यामुळे आम्ही पाठलाग करताना मागे पडले. आम्ही शेवटचे चेंडू खेळू शकलो नाही".
हार्दिक पांड्या अखेरी जसप्रीत बुमराहबद्दलही बोलला, ज्याने अखेर आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. 7.20 च्या सरासरीने त्याने 29 धावा दिल्या.
"त्याच्या (बुमराह) असण्याने संघ खूप खास होतो. तो आला आणि त्याने त्याचं काम केलं. तो संघात असल्याने आम्हाला आनंद झाला. आयुष्यात कधीही मागे हटू नका आणि नेहमीच त्याची सकारात्मक बाजू पहा. तिथे जा, तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला पाठिंबा द्या. आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देत आहोत, फक्त निकाल आमच्या वाट्याला येईल अशी आशा करतो," असं हार्दिक पंड्याने शेवटी म्हटलं.