Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

15 कोटींच्या लिलावानंतर 'या' गोलंदाजानं वाढवलं विराट कोहलीचं टेन्शन

या गोलंदाजानं का वाढवलं विराट कोहलीचं टेन्शन जाणून घ्या.

15 कोटींच्या लिलावानंतर 'या' गोलंदाजानं वाढवलं विराट कोहलीचं टेन्शन

मुंबई: विराट कोहली आपल्या अजब आणि लाजीरवाण्या विक्रमामुळे ट्रोल होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीमध्ये विराट शून्यवर आऊट झाल्यामुळे ट्रोल होत आहे. आता आयपीएलसाठी त्याचं टेन्शन वाढलं आहे. याचं कारण म्हणजे RCBनं लिलावात सर्वाधिक बोली लावलेल्या खेळाडूमुळे हे टेन्शन वाढल्याचं सांगितलं जात आहे. 

न्यूझिलंडचा गोलंदाज कायले  जेमिन्सनवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 15 कोटींची बोली लावत त्याला संघात घेतलं. मात्र त्याची सध्याची कामगिरी अत्यंत निराशाजनकच आहे. त्यामुळे विराट कोहली आणि त्याच्या IPLमधील संघाला ट्रोल केलं जात आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझिलंड 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने जेमिन्सच्या अखेरच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारले. इतकच नाही तर 55 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 6 षटकारांसह 79 नाबाद धावा केल्या. काईल जेमिन्सनला या सामन्यात पुरतं जेरीस आणल्याचं पाहायला मिळालं. 

जेमिन्सनची फलंदाजी अपयशी ठरली आहे. टी 20मध्ये गडी बाद करण्याचा सतत्यानं प्रयत्न करत असला तरी त्याला ते यशस्वीपणे जमलं नाही. त्यातच RCB ने त्याला 15 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतल्यानं आता RCB आणि विराट दोघांनाही ट्रोल केलं जात आहे. त्याच्या वाईट कामगिरीमुळे आता विराटच्या संघाचं IPLमधलं टेन्शन मात्र वाढलं आहे. 

 

Read More