Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप

आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. 

मुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप

कोलकाता : आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. मात्र, कालचा पराभवामुळे कोलकाता संघाचे स्थान घसरुन पाचव्या स्थानावर आलेय.मुंबईने कोलकात्याविरुद्धचा सामना १०२ धावांनी जिंकत मुंबईनं चौथ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा पाचवा विजय ठरलाय. 

मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यात समसमान दहा गुण आहेत. पण मुंबईनं कोलकात्यावर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट उंचावलाय. इडन गार्डन्सवरच्या या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी २११ धावांचं आव्हान दिलं होतं. 

मात्र मोठ्या धावसंख्येचं आव्हान आणि प्ले ऑफची तीव्र चुरस यांच्या दडपणाखाली कोलकात्याचा अख्खा संघ १०८ धावांत गडगडला..ईशान किशनच्या ६२ धावा आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईनं हा विजय साकारला.

Read More