Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL वेळी मैदानात भाव खाऊन जाणरा रोबोट डॉग काय करु शकतो? कोणी बनवलाय? जाणून घ्या सर्वकाही!

IPL Robotic Dog: आयपीएल मॅचदरम्यान मैदानात येणाऱ्या रोबोटिक कुत्र्याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.

IPL वेळी मैदानात भाव खाऊन जाणरा रोबोट डॉग काय करु शकतो? कोणी बनवलाय? जाणून घ्या सर्वकाही!

IPL Robotic Dog: सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम सुरु आहे. यंदाचा सिझन कोण जिंकणार? याबद्दल जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. पण मॅचदरम्यान मैदानात येणाऱ्या रोबोटिक कुत्र्याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. कुत्र्याच्या आगाराचा, टॉसवेळी दिसणारा, मैदानात खेळाडुंसोबत दिसणारा हा रॉबोटिक डॉग तंत्रज्ञानाचा वेगळा अविष्कार आहे. पण आयपीएल सामन्यांव्यतिरक्त हा रोबोटिक डॉग काय करु शकतो? याचा अविष्कार कोणी केला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

हा रोबोट त्याच्या हालचालींवरुन सामान्य कुत्र्यासारखा दिसतो. पण त्याचे धातूचे शरीर आणि डोके नसलेली रचना यामुळे तो सामान्य कुत्र्यापेक्षा वेगळा दिसतो. याचा एक व्हिडिओ अधिकृत आयपीएल अकाउंटवरुन पूर्वी शेअर करण्यात आला होता.

ज्यामध्ये प्रसिद्ध समालोचक डॅनी मॉरिसन यांनी या नवीन कॅमेरा कुत्र्याची ओळख करून दिली. त्यांनी रोबोटिसोबत खूप धमाल केली. त्याच्यासोबत शर्यत लावली. तो पायाने 'हार्ट इमोजी' बनवू शकतो, हे दाखवून दिले. या रोबोटवर तपकिरी फरसारखा लेप आहे आणि त्याचा चेहरा कॅमेऱ्यासारखा आहे. यात एक कॅमेरा आहे जो GoPro सारख्या अॅक्शन कॅमेऱ्यासारखे काम करतो. मैदानाच्या चहुबाजून खास अॅंगल देणे हे त्याचे काम आहे. म्हणजेच अशा कोनातून सामना दाखवणे जो प्रेक्षकांनी आतापर्यंत क्वचितच पाहिला असेल.

आयपीएल रोबोट डॉग काय करू शकतो?

आयपीएल रोबोट डॉग धावू शकतो, उडी मारू शकतो, आवाज समजू शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो आणि त्याच्या पुढच्या पायांनी लव आकारही बनवू शकतो. यामुळे एक अनोखा डॉग-आय व्ह्यू मिळतो. क्रिकेट फॅन्ससाठी सामना आणखी रोमांचकारी होतो. आयपीएल रोबोट डॉग अमेरिकन कंपनी बोस्टन डायनॅमिक्सच्या चार पायांच्या रोबोट्सपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. अशा रोबोट्सचा वापर लष्करी साहित्य वाहून नेण्यापासून ते धोकादायक ठिकाणांची तपासणी करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. आयपीएलचा हा रोबोट कुत्रा लहान आणि खूप मजेदार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी खेळाडूंमध्ये हा कुत्रा दिसला होता. हे पाहून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आनंदी दिसत होता तर दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल थोडा गोंधळलेला दिसत होता. हा कुत्रा अचानक मागच्या पायांवर उभा राहिला तेव्हा एमआयचा गोलंदाज रीस टॉपलीला धक्का बसला! एलएसजी आणि सीएसके यांच्यातील सामन्यातही हा अद्भुत रोबोट मैदानावर दिसला. जेव्हा कॅमेरा महेंद्रसिंग धोनीकडे गेला तेव्हा त्याने गंमतीने त्या उचलून आडवे केले. हे दृश्य पाहून चाहत्यांना हसू आवरता आले नाही.

कुत्र्याला नावे सुचवण्याचे आवाहन

या नवीन रोबोट कुत्र्यासाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहन आयपीएलकडून करण्यात आले आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर लोक त्यासाठी मजेदार आणि गोंडस नावे सुचवत आहेत. हा रोबोटिक कुत्रा केवळ मनोरंजनासाठी नाही तर क्रीडा प्रसारणाच्या जगात आणखी एक मोठा अविष्कार आहे. आजच्या युगात कॅमेरा, ग्राफिक्स, बॉल ट्रॅकिंग आणि व्हिडिओची गुणवत्ता सुधारत असल्याने क्रिकेट आणि इतर खेळ पाहण्याची मजा देखील द्विगुणित होतेय, हे यातून दिसते.

Read More