IPL 2023: सर्वांना प्रतिक्षा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. आगामी लीगच्या उद्घाटनाचा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. 31 मार्च रोजी हा खेळला जाईल. लीगमधील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. (IPL schedule 2023 Full fixtures table dates match timings and venues latest marathi news)
आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची अधिकृत घोषणा केली गेली. अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाळा या 8 स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 70 सामने साखळी फेरीतील असतील. तर 18 डबर हेडर सामने खेळवले जाणार आहे.
That's how excited we are!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 17, 2023
Liftoff - March a href="https://twitter.com/hashtag/TATAIPL?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#TATAIPL #WhistlePodu pic.twitter.com/Vf7yfQkA7b
ग्रुप A - Mumbai Indians, Kolkata Knight Riders, Rajasthan Royals, Delhi Capitals, Lucknow Super Giants
ग्रुप B - Chennai Super Kings, Sunrisers Hyderabad, Punjab Kings, Royal Challengers Bangalore, Gujarat Titans
पहिला सामना 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होईल. तर दुसरा सामना 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्स (PK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळवला जाणार आहे. यंदाच्या लीगमध्ये 10 संघांपैकी प्रत्येक संघ घराबाहेर आणि घरामध्ये प्रत्येकी 7 सामने खेळतील.
31 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स
1 एप्रिल - पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स
1 एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स
2 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स
2 एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू