Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएल टीमनी कायम ठेवले हे खेळाडू

आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. 

आयपीएल टीमनी कायम ठेवले हे खेळाडू

मुंबई : आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या सगळ्या टीमपैकी सगळ्यात मोठा धक्का हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्सनं दिला आहे. बंगलोरनं कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंमध्ये सरफराजचा समावेश आहे. तर कोलकत्यानं त्यांचा कॅप्टन गौतम गंभीरचा टीममध्ये समावेश केलेला नाही. या टीमनी दिग्गजांना कायम ठेवलं नसलं तरी आयपीएल लिलावावेळी राईट टू मॅच कार्डचा वापर करून या खेळाडूंना पुन्हा टीममध्ये घेतलं जाईल.

टीमनी कायम ठेवले हे खेळाडू

मुंबई : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या

चेन्नई : धोनी, रैना, जडेजा

बंगलोर : कोहली, एबी डिव्हिलियर्स, सरफराज

दिल्ली : मॉरिस, पंत, अय्यर

कोलकाता : सुनिल नारायण, आंद्रे रसेल

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार

राजस्थान : स्टिव्ह स्मिथ

पंजाब : अक्सर पटेल

राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय?

मुंबई इंडियन्सनं पोलार्डला टीममध्ये कायम ठेवलं नाही तर त्याला आयपीएलच्या लिलावाला सामोरं जावं लागेल. या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं पोलार्डला ८ कोटी रुपयांना विकत घेतलं तर मुंबई इंडियन्स राईट टू मॅच कार्डचा वापर करून पुन्हा पोलार्डला टीममध्ये घेऊ शकतं. २७ आणि २८ जानेवारीला आयपीएल खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावामध्ये टीमना जास्तीत जास्त दोन राईट टू मॅच कार्ड वापरता येतील. 

Read More