Trevor Bayliss Punjab Kings : IPl मधील पंजाब किंग्ज संघाचे अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आलं आहे. पंजाबच्या संघाने नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने हा नव्या प्रशिकाची निवड केली आहे. (Punjab Kings Head Coach Trevor Bayliss)
कोण आहे नवीन प्रशिक्षक:
ट्रेवल बेलिस पंजाबचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. बेलिस यांनी याआधी IPL मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदी असताना 2012 आणि 2014 ला KKR ने विजेतेपद पटकावलं होतं. त्यासोबत 2019 साली विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी बेलिस होते.
IPL च्या पहिल्या सीझनपासून पंजाबचा संघ खेळत आहे. मात्र त्यांना एकदाही IPL ट्रॉफी जिंकता आली नाही. 2022 च्या आयपीएल लिलावात पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा, शिखर धवन या खेळाडूंना खरेदी केलं होतं. मात्र तरीही पंजाब संघ सहाव्या स्थानावर होता. कुंबळे हे गेली तीन वर्ष संघाच्या हेडकोचपदावर होते. मात्र पंजाब संघ एकदाही क्वालिफाय झाला नाही.
New Coach Alert
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 16, 2022
IPL winner
ODI World Cup winner
CLT20 winner
Here's wishing a very warm welcome to our new Head Coach, Trevor Bayliss.
Here's looking forward to a successful partnership! #PunjabKings #SaddaPunjab #TrevorBayliss #HeadCoach pic.twitter.com/UKdKi2Lefi
दरम्यान, सिडनी सिक्सर्सला बिग बॅश लीगचं विजेतेपद मिळवून देण्यातही ट्रेवल बेलिस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2020 आणि 2021 च्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादचे बेलिस मुख्य प्रशिक्षक होते. आता प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जने मुख्य प्रशिक्षकपदी बेलिस यांची निवड केल्यावर ती ते IPLची पहिली ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.