Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021: पृथ्वीच्या बॅटिंगवर गर्लफ्रेंड फिदा, फोटो शेअर करत म्हणाली...

पृथ्वीच्या कामगिरीवर गर्लफ्रेंड खूश, फोटो शेअर करत काय म्हणाली वाचा, या पोस्टमुळे पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनबाबत तुफान चर्चा रंगली आहे. 

IPL 2021: पृथ्वीच्या बॅटिंगवर गर्लफ्रेंड फिदा, फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स नुकताच सामना झाला. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या दमदार खेळीमुळे दिल्ली संघाला विजय मिळवण्यात यश मिळालं. या जोडीनं मैदानात कमाल केली. 

पृथ्वी शॉच्या जबरदस्त फलंदाजीवर त्याची गर्लफ्रेंड फिदा झाली आहे. पृथ्वी शॉने 38 चेंडूत 72 धावा केल्या ज्यामध्ये 8 चौकार आणि 8 षटकार ठोकले होते. त्याने आपला सलामीवीर फलंदाज शिखर धवनसोबत 138 धावांची भागीदारी केली. त्यामुऴे दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवणं सोपं झालं. 

पृथ्वी शॉच्या या नेत्रदीपक कामगिरीने त्याची गर्लफ्रेंडही खुश झाल्याची चर्चा आहे. पृथ्वीचा फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करत तिने जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. शॉने काय सुरुवात केली! असं म्हणत तिने हार्टचा इमोजी ठेवला आहे. तिने ठेवलेल्या स्टेटसमुळे तुफान चर्चा रंगली आहे. त्याची गर्लफ्रेंडही त्याच्या कामगिरीवर खूश असल्याचं सांगितलं जात आहे. 

fallbacks

पृथ्वी शॉ प्राची सिंहला डेट करत असल्याच्याही खूप चर्चा रंगल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वीची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर IPLमधील दिल्लीच्या पहिल्याच सामन्यात पृथ्वीनं नेत्रदीपक कामगिरी केली. त्याची कामगिरी पाहून सर्वजण भारावून गेले. प्राची आणि पृथ्वी एकमेकांना डेट करत असून ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत मात्र त्याबाबत दोघांनीही सध्या तरी मौन बाळगलं आहे. 

Read More