पॅरिस पॅराऑलिम्पिक्समध्ये आपले भारतीय खेळाडू चांगलेच यश मिळवत आहेत. अशातच एक भारतीय खेळाडू रौप्य पदकावर समाधानी होऊ पाहत असताना, त्याला सुवर्ण पदक मिळाले. 7 सप्टेंबर रोजी एका ईराणी खेळाडूने सुवर्ण पदक गमवावे लागले. चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूने जिंकण्याची आशा सोडली असताना, त्याला कांस्य पदक मिळाले. शेवटच्या क्षणी अचानक निर्णय बदलण्याचं कारण होतं ईराणी खेळाडूची झालेली चूक...
Beit Sayah's flag celebrations at Tokyo 2020 Paralympics - no fuss, no action
(@AliSafvi4989192) September 7, 2024
Beit Sayah's flag celebrations at Paris 2024 Paralympics - gold snatched away
#Paralympic2024 pic.twitter.com/jwl4TwilNu
पदक गळ्यात घालण्याआधीच ठरवला अपात्र
पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 च्या भालाफेक एफ 41, या खेळात ईरानी खेळाडू सादेघ बेत सयाह याने सुवर्ण पदक पटकावलं होतं. मात्र पदक गळ्यात घालण्याआधीच तो अपात्र ठरवला गेला आणि त्यामुळे भारताच्या नवदीप सिंहला जो दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याला सुवर्ण पदक मिळालं आहे. हे भालाफेक एफ 41 गटात भारताला मिळालेले पहिले पदक आहे. नवदीपचा हा विजय ऐतिहासिक आहे. अंतिम फेरीत नवदीपची पहिली फेकी फेल गेली होती. मात्र दुसऱ्या वेळी त्याने 46.39 मीटर लांब भाला फेकून खेळात वापसी केली. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये नवदीप चौथ्या पदावर होता.
नवीन विक्रम
नवदीपने पॅराऑलिम्पिक्समध्ये तिसऱ्या फेकीत सर्वांना थक्क करून सोडले. त्याने 47.32 मीटर लांब भाला फेकून नवीन विक्रम केला. नंतर ईराणी खेळाडूने पाचव्या फेकीत 47.64 मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदक पटकावले खरे, पण अंतिम फेरीच्या थोड्यावेळानंतर त्याला स्पर्धेतून बाद घोषित करण्यात आले.
अयोग्य वर्तनामुळे बाद
ईराणी खेळाडूने पॅराऑलिम्पिक्सच्या नियमावलीत न बसणारी कृती केली, म्हणून त्याला बाद केले. सादेघ बेत सयाहने नक्की काय चूक केली, ते पॅरिस पॅराऑलिम्पिक्स कमिटीने सांगितलेले नाही . पण प्रेक्षकांचे असे म्हणणे आहे की, खेळादरम्यान अरबी भाषेत लिहिलेला काळा झेंडा फडकला आणि सुवर्ण पदकाला मुकला. राजकारणाशीसंबंधीत कोणतीही कृती चालणार नाही हे पॅराऑलिम्पिक्सच्या नियमावलीत नमूद केलेले आहे. सादेघ बेत सयाहनेच्या अयोग्य वर्तनामुळे त्याला बाद करण्यात आले.