Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO: अफगाणिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणचा 'अफगाण जलेबी' गाण्यावर डान्स, राशीद खानची कमेंट चर्चेत, 'माझ्याशिवाय...'

Irfan Pathan Viral Video: आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव करत, पुन्हा एकदा सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं.   

VIDEO: अफगाणिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणचा 'अफगाण जलेबी' गाण्यावर डान्स, राशीद खानची कमेंट चर्चेत, 'माझ्याशिवाय...'

Irfan Pathan Viral Video: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दुबळा म्हणून ओळखला जाणारा अफगाणिस्तान संघ आता जायंट किलर ठरत आहे. अफगाणिस्तान संघ प्रत्येक स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी करत जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडतो. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यासारख्या तुलनेने बलाढ्या संघांना त्यांनी याआधी नमवलं आहे. त्यातच आता चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी इंग्लंडचा पराभव करत पुन्हा एकदा आपण दुबळा संघ नसल्याचं सिद्ध केलं आहे. त्यांनी अखेरच्या चेंडूवर इंग्लंडचा पराभव केला आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवला. अफगाणिस्तानच्या विजयानंतर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने डान्स करत आपला आनंद व्यक्त केला. 

इरफान पठाणने नेहमीच अफगाणिस्तान संघाप्रती असणारं प्रेम व्यक्त केलं आहे. यामुळे जेव्हा अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला तेव्हा इरफानने 'अफगाण जलेबी' गाण्यावर डान्स केला. इंस्टाग्रामला त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. अफगाणिस्तान संघाच्या विजयावर त्याने दाखवलेला उत्साह आणि आनंद सर्वांनाच आवडला आहे. 

इरफान पठाणच्या या पोस्टवर अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू राशीद खानने प्रतिक्रिया दिली आहे. राशीद खानने या पोस्टवर हार्ट इमोजी पाठवली आहे. 'भाईजान माझ्याशिवाय डान्स, हाहा धन्यवाद तुमच्या पाठिंबा आणि प्रेमासाठी,' अशी कमेंट त्याने लिहिली आहे. 

इरफान पठाणच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अफगाणिस्तानच्या विजयावर भारतीयही आनंदही होतात असं एकाने लिहिलं आहे. तर एकाने, मी या व्हिडीओची वाटच पाहत होतो, धन्यवाद पठाण साहेब असं एकाने म्हटलं आहे. 

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू समीउल्ला शिनवारीनेही या व्हिडिओवर कमेंट केली आणि पठाणच्या सततच्या प्रोत्साहनाचे कौतुक केलं. "तुमच्या सुंदर हृदयाच्या माध्यमातून नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद," असं त्याने लिहिलं आहे.

पठाणने अफगाणिस्तानच्या यशाचा आनंद साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतात झालेल्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर रशीद खानसोबतचा डान्स व्हायरल झाला होता. 

Read More