Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारतीय टीममध्ये कमबॅकची अजूनही इरफान पठाणला आशा

स्विंग बॉलिंगनं प्रतिस्पर्धी टीमची भंबेरी उडवणारा इरफान पठाण भारतीय टीमपासून जवळपास ६ वर्षांपेक्षा जास्त काळ लांब आहे.

भारतीय टीममध्ये कमबॅकची अजूनही इरफान पठाणला आशा

मुंबई : स्विंग बॉलिंगनं प्रतिस्पर्धी टीमची भंबेरी उडवणारा इरफान पठाण भारतीय टीमपासून जवळपास ६ वर्षांपेक्षा जास्त काळ लांब आहे. पण अजूनही त्यानं भारतीय टीममध्ये कमबॅक करण्याची आशा सोडली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय टीममध्ये परत यायचं माझं उद्दीष्ट आहे. यासाठी माझा सरावही सुर आहे. भारतीय टीममध्ये मला स्थान मिळू शकतं, असं इरफान पठाण म्हणाला आहे. इरफान सध्या ३३ वर्षांचा आहे. इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसुफ पठाण यांनी पंजाबमध्ये एका क्रिकेट अॅकेडमीचं उद्घाटन केलं.

इरफान पठाण भारताकडून २९ टेस्ट, १२० वनडे आणि २४ टी-२० खेळला आहे. २००८ साली पठाण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये शेवटची टेस्ट खेळला होता. तर २०१२ साली श्रीलंकेविरुद्ध तो शेवटची वनडे खेळला. इरफाननं टेस्टमध्ये १०० विकेट, वनडेमध्ये १७३ विकेट आणि टी-२०मध्ये २८ विकेट घेतल्या. तर त्यानं टेस्टमध्ये ३१.५७ च्या सरासरीनं ११०५ रन, वनडेमध्ये २३.३९ च्या सरासरीनं १५४४ रन आणि टी-२०मध्ये २४.५७ च्या सरासरीनं १७२ रन केल्या. 

Read More