Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शुभमन गिलला डेट करतेय 23 वर्षांची अवनीत कौर? भारताचा विजय साजरी करताच लोक म्हणाले 'क्रिकेटबद्दल काही माहित नाही आणि...'

Is Avneet Kaur Dating Shubman Gill : अवनीत कौरनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

शुभमन गिलला डेट करतेय 23 वर्षांची अवनीत कौर? भारताचा विजय साजरी करताच लोक म्हणाले 'क्रिकेटबद्दल काही माहित नाही आणि...'

Is Avneet Kaur Dating Shubman Gill : क्रिकेटर शुभमन गिलसोबत अभिनेत्री अवनीत कौरच्या कथित रोमान्सविषयीच्या चर्चा सुरु आहेत. सगळ्यात आधी राघव शर्मासोबत अवनीत कौरचं नाव जोडण्यात आलं होतं. आता शुभमन गिलसोबत असलेल्या कथित रिलेशनशिपच्या चर्चांमुळे अवनीत ही चर्चेत आहे. दुबईमधअये भारत आणि ऑस्ट्रेलिया ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मॅचला गेल्यानंतर अवनीतवर लोकांनी टीका केली आहे. हा सामना जिंकल्यानंतर नेटकरी तिलाच सवाल करत आहेत. 

अवनीतनं भारताला पाठिंबा देत एक फोटो शेअर केला होता. पण नेटकऱ्यांनी शुभमन गिलला घेऊन तिची खिल्ली उडवली आहे. तर अनेकांनी तो त्यांचा आता मेहुणा आहे असं म्हटलं आहे. काहींनी अवनीतवर आरोप केले की क्रिकेटपटूंचं लक्ष वेधून घेण्यासाठी मॅच पाहत असल्याचे आरोप केले आहेत. तर काहींनी तिला राघवविषयी प्रश्न विचारले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

अवनीत कौरनं ब्लू क्रॉप टॉप आणि बेज जींसमध्ये स्टायलिश लूक परिधान केला होता. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं एक बॅग, काळ्या रंगाचे शेड्स आणि मेसी बन केला होता. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पुढच्या रांगेत असलेल्या अवनीतनं तिथून काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत होती असं अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे. अवनीत कौर आणि शुभमन गिलच्या डेटिंगच्या अफवा सुरु झाल्या आहेत, पण दोघांपैकी एकानं देखील या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर आता ते दोघं काय पोस्ट करतात किंवा कशा प्रकारे सोशल मीडिया हातळतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

या सगळ्यात अवनीतचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. तिनं भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर नाचताना व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओतून तिला किती आनंद झाला हे दिसून येत आहे. अवनीतनं इंडिया इंडिया असं ओरडत आनंद साजरा केला आहे. पण लोकांना कमेंट सेक्शनमध्ये तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. एकानं कमेंट करत लिहिलं की तिला क्रिकेटविषयी काही माहितीये का? दुसरा नेटकरी म्हणाला, जेव्हा मागून कोणी तरी सांगितलं की आपण जिंकलो तेव्हा तिला कळलं की आपण जिंकलो. अशा वेगवेगळ्या कमेंट करत नेटकऱ्यांनी अवनीतला ट्रोल केलं आहे. 

हेही वाचा : 'अवतार'साठी गोविंदाला मिळालेली 180000000 ची ऑफर; मग माशी कुठं शिंकली? खुलासा करत अभिनेता म्हणतो...

या सगळ्यात रिपोर्ट्स समोर आल्या आहेत की अवनीत कौर आणि राघव शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. पण तिच्या प्रोफेशनमुळे तिनं हे सगळ्यांपासून लपवून ठेवलं. सुरुवातीला राघव अवनीतकडे आकर्षित झाला होता आणि तिचा पाठलाग देखील करायचा. त्याचं कारण म्हणजे त्या दोघांनी एकाच प्रोडक्शन बॅनरखाली काम केलं होतं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या नात्याला सीक्रेटिव्ह ठेवयाचं होतं. 

Read More