IND vs ENG Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या निर्णायक कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला जिंकण्यासाठी 4 विकेट्स हव्या आहेत, तर इंग्लंडला फक्त 35 धावांची गरज आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत देशातल्या एका मोठ्या क्रिकेटप्रेमी आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी माजी कर्णधार विराट कोहली यांची आठवण काढत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे, "या संपूर्ण मालिकेत मला कोहलीची उणीव जाणवत होती, पण या सामन्यात तर ती अतिशय तीव्र होती. त्याचं मैदानावर असणं, त्याचा जोश, संयम आणि प्रेरणादायी उपस्थिती असती तर कदाचित सामना वेगळ्या दिशेने गेला असता." त्यानंतर थरूर यांनी थेट विराट कोहलीला उद्देशून म्हटलं, "आता टेस्टमधून संन्यास परत घेण्यास उशीर झाला का? विराट, देशाला तुमची गरज आहे!"
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपुर्वीच टेस्ट क्रिकेटमधून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या फलंदाजीतील मोक्याच्या क्षणी कोहलीच्या अनुपस्थितीमुळे संघाची कामगिरी बऱ्याच वेळा दबावाखाली आली आहे.
I’ve been missing @imVkohli a few times during this series, but never as much as in this Test match. His grit and intensity, his inspirational presence in the field, not to mention his abundant batting skills, might have led to a different outcome. Is it too late to call him out…
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 3, 2025
कोहलीचा टेस्ट कारकिर्दीकडे पाहिल्यास, त्यांनी 123 कसोटी सामन्यांत 210 डाव खेळून एकूण 9,320 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर 30 शतकं आणि तब्बल 7 द्विशतकं नोंदवलेली आहेत. या आकडेवारीतून त्यांच्या क्लास आणि स्थैर्याचं सहज दर्शन घडतं.