Ishan Kishan : जवळपास वर्षभरापासून टीम इंडियात संधी न मिळालेला स्टार फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) सध्या काउंटी चॅम्पियनशीपमध्ये नॉटिंघमशर संघात खेळतोय. ईशाने नॉटिंघमशरसह 2 सामन्यांचा करार केला. त्यानंतर ईशानने यॉर्कशायर विरुद्ध 22 जून पदार्पण करून काउंटी चॅम्पियनशीप डेब्यूत प्रतिभा दाखवून देत पहिल्या डावात 98 चेंडूत 87 धावांची खेळी केली. ईशानची इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र असं असताना ईशान किशन सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याचा पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद अब्बास सोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यावरून नेटकरी त्याला ट्रोल करतायत.
काउंटी चॅम्पियनशीपमध्ये नॉटिंघमशायर विरुद्ध यॉर्कशायर यांच्यात सामना खेळवला जातोय. यात भारताचा स्टार फलंदाज ईशान किशन आणि पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद अब्बास हे दोघे एकाच संघात खेळतायत. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजमध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक तेव्हा चकित झाले जेव्हा ईशान किशनने पाकीस्तानी क्रिकेटर मोहम्मद अब्बासची गळाभेट घेतली.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने एडम लिथला राउंड द विकेट बॉल टाकला. हा बॉल ऑफ स्टंपवर लागला, पण बॉलने वेगाने उसळी घेतली आणि डिफेन्ससाठी बाहेरच्या दिशेला गेली. ईशानने स्टंपच्या मागे बॉल पकडला. अब्बास आणि ईशानने मिळून यॉर्कशायरच्या ओपनिंग फलंदाजाला एडम लिथला गोल्डन डकवर आउट केले. यामुळे नॉटिंगहॅमशायरला त्यांच्या पहिल्या डावातील 487 धावांचा बचाव करण्यासाठी चांगली सुरुवात मिळाली. विकेट घेतल्यावर मोहम्मद अब्बासला ईशान किशनने मिठी मारली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांच्यातील संबंध पुन्हा तणावपूर्ण झाले. अशा परिस्थितीत ईशान किशनने पाकिस्तान क्रिकेटरची गळाभेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर काही नेटकरी ईशानवर नाराज झाले असून त्यांनी व्हिडीओ खाली 'देशद्रोही ईशान किशन' असं म्हटलं आहे. काउंटी क्रिकेटमध्ये असं आतापर्यंत सहावेळा घडलं जेव्हा एका भारतीय आणि एका पाकिस्तानी क्रिकेटरने ड्रेसिंग रूम शेअर केला.
The perfect start NOTvYOR https://t.co/bReiSrPNDj pic.twitter.com/n8jJSZRuao
June 23, 2025
ईशान किशनने टीम इंडियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2023 साली खेळला होता. ईशानची इंडिया ए टीममध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र ईशानला इंग्लंड लायन्स विरूद्धच्या 2 अनऑफिशियल टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर ईशाने इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.