अहमदाबाद : क्रिकेट विश्वात सध्या भारतीय युवा क्रिकेटपट्टू ईशान किशनच्या (Ishan Kishan) नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या डेब्यु मॅचमध्येच (Ishan Kishan Debut Match) त्याने आपण भारतीय क्रिकेट विश्वाचे उज्ज्वल भविष्य असल्याचे दाखवून दिलंय. टॉस जिंकून कोहलीने इंग्लंडला पहिले बॅटींगला बोलावले. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 164 रन्स बनवले. टी 20 मध्ये हे लक्ष्य मोठे नव्हते. पण सॅम करनने पहिल्या ओव्हरमध्ये केएल राहुलचा विकेट घेतला आणि मॅच इंग्लडच्या बाजुने झुकतेय का ? अशी भीती वाटू लागली.
दरम्यान ईशान किशनने (Ishan Kishan) भारतीय संघात डेब्यू केला. आपल्या पहिल्याच सामन्यात ईशानने शानदार 56 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने इंग्लंडला 7 विकेटने हरवून सीरिजमध्ये 1-1 ची बरोबरी केली. ईशानला या उत्तम खेळाकरता 'मॅन ऑफ द मॅच' (Ishan Kishan get emotional afther the blast debut) देण्यात आला.
ईशानने मोठमोठे सिक्सर मारुन 28 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. डेब्यूमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा क्रिकेटर ठरला. याआधी अजिंक्य राहणेने हा कारनामा केलाय. अजिंक्यने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 61 रन्सची खेळी केली. या लिस्टमध्ये अजिंक्य राहणे, ईशान किशन यांच्यासोबत रॉबिन उथ्थपा आणि रोहित शर्माचे नाव देखील जोडलं गेलंय. दोघांनी 2007 मध्ये पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध हा कारनामा केला. त्यावेळी दोघांची दुसरी टी २० मॅच होती. त्यांना आपल्या पहिल्या मॅचमध्ये बॅटींग मिळाली नव्हती.
Fifties in maiden innings in T20Is for India:
— Sampath Bandarupalli (@SampathStats) March 14, 2021
Robin Uthappa (50) vs PAK, 2007
Rohit Sharma (50*) vs SA, 2007
Ajinkya Rahane (61) vs ENG, 2011
ISHAN KISHAN (56) vs ENG, Today
Only Ajinkya and Ishan scored in their debut game. #INDvENG
ईशानने आपल्या खेळीत पाच फोर आणि चार सिक्सर लगावले. यानंतर तो पदार्पणातील पहिल्या डावात चार षटकार ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटपटूही ठरला. ईशानला तडाखेबाज खेळीसाठी सामनावीर म्हणूनही निवडले गेले.
आता टी -२० मध्ये पदार्पणाच्या सामन्यात सामनावीर ठरलेला चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्यांच्याआधी मोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांनी ही कामगिरी केली आहे.
या शानदार खेळानंतर ईशानने सांगितलं की,'या खेळाचं संपूर्ण श्रेय हे माझ्या वरिष्ठ खेळाडूंना जातं. ज्यांनी मैदानावर जाऊन मला माझा खेळ खेळण्याचा सल्ला दिला. पहिल्याच सामन्यात आपण टॉपच्या टीमसोबत खेळणं सोपी गोष्ट नाही.'
'आता मला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. या खेळानंतर माझ्यातील धावांची भूक वाढली असून मला आणखी चांगला सामना खेळायचा आहे.', असं देखील तो म्हणाला. यावेळी ईशानने आपल्या कोचच्या वडिलांचं देखील स्मरण केलं. त्यांच काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. ईशान त्याचा आताचा खेळ त्यांना समर्पित करत आहे.
ईशानने आपल्या संपूर्ण खेळाचं श्रेय कोचच्या वडिलांना समर्पित केलं आहे. ईशान म्हणतो की,'माझ्या कोचने मला सांगितलं होतं की, पहिल्या सामन्यात माझ्या वडिलांसाठी कमीत कमी अर्धशतक तरी नक्की करं. याच कारणामुळे मी माझा संपूर्ण खेळ त्यांना समर्पित केला आहे.'