Ishan kishan century in buchi babu tournament : बुची बाबू 2024 च्या स्पर्धेत टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसत आहे. मध्य प्रदेश आणि झारखंड क्रिकेट असोसिएशन यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज इशान किशन याने वादळी खेळी करत शतक ठोकलं अन् सिलेक्टर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फक्त 86 चेंडूत इशान किशनने शतक पूर्ण केलं. 92 धावांवर असताना इशान किशनने सलग दोन षटकार मारत शतक पूर्ण केलं. त्याच्या ही युनिक स्टाईल सर्वांना आवडली आहे. इशान किशनने 107 बॉलमध्ये 106.54 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या. यामध्ये 5 फोर अन् 10 सिक्सचा सामावेश आहे.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रँक्टमधून इशान किशनला काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर इशान एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. इशानसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले होते. परंतू आयपीएलमध्ये इशानने दमदार कामगिरी करत वर्ल्ड कप सिलेक्शनसाठी ठसा उमटवला होता. परंतू टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये देखील त्याला स्थान मिळालं नाही. बीसीसीआयची सुचना फाट्यावर मारणं इशान किशनला महागात पडलं.
आता इशान किशन देशांतर्गंत क्रिकेट खेळतोय. मात्र, बीसीसीआय सचिव जय शहा यांनी इशान किशनला स्पष्ट शब्दात वॉर्निंग दिलीये. इशान किशन टीम इंडियात कसा परत येऊ शकतो? असा सवाल जय शहा यांनी इंडियन एक्सप्रेसच्या एका मुलाखतीत विचारला गेला होता. त्यावेळी जय शहा यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याप्रमाणे उत्तर दिलं. इशानला नियमांचे पालन करावे लागेल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असं जय शहा यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
Captain #IshanKishan Innings Highlights
— Retrograde#96 (@Retrograde2377) August 16, 2024
Proud of him pic.twitter.com/Nw1TUqYzWO
दरम्यान, प्रसिद्ध टूर्नामेंट बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत अवघ्या 86 चेंडूत शतक झळकावून ईशानने आपल्या बाकीच्या प्रतिस्पर्ध्यांनाही सावध राहण्याचा संदेश दिलाय. प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश संघाने 91.3 षटकात 10 गडी गमवून 225 धावा केल्या. अरहाम अकीलने 57 आणि शुभम कुशवाहने 84 धावांची खेळी केली. तर इशान किशन झारखंड क्रिकेट असोसिएशन संघाचं नेतृत्व करतोय.