Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पर्थ टेस्टमध्ये भरमैदानात ईशांत-जडेजामध्ये बाचाबाची

मैदानात झालेल्या या वादाचा व्हिडिओ व्हायरल

पर्थ टेस्टमध्ये भरमैदानात ईशांत-जडेजामध्ये बाचाबाची

मुंबई : टीम इंडियाचा गोलंदाज ईशांत शर्मा आणि सब्सिट्यूट खेळाडू रविंद्र जडेजा यांच्यात पर्थच्या मैदानात वाद पाहायला मिळाला. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. भारताचा या सामन्यात 146 रनने पराभव झाला. दोघांमधील वादाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही खेळाडू फार रागात दिसत आहेत.

दोघांमध्ये नेमका वाद कशावरुन झाला हे समोर आलं नाही. पण फिल्ड प्लेस्मेंटवरुन हा वाद झाल्याचं बोललं जातं आहे. दोन्ही खेळाडू बऱ्याचदा एकमेकांजवळ धावून आले. रागात असलेल्या ईशांतने जडेजाकडे बोट दाखवून देखील काही तरी इशारा केला. यानंतर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी दोघांना शांत केलं.

भारताने पर्थ टेस्टमध्ये 4 बॉलर्सचा संघात समावेश केला होता. या सामन्यात भारताने एकही स्पिनरला टीममध्ये घेतलं नव्हतं. पण विरुद्ध टीम ऑस्ट्रेलियाच्या ऑफ स्पिनर नाथन लायनने सामन्यात एकूण 8 विकेट घेतलं. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 3 विकेट घेतले.

Read More