Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जसप्रीत बुमराह आणि करुण नायर एकमेकांशी भिडले...रोहितने मात्र युद्धभूमीवरही घेतली मजा; बघा Viral Video

Jasprit Bumrah vs Karun Nair :  आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी आले. यावेळी जसप्रीत आणि  करुण नायर यांच्या मैदानातच भांडण झालं.   

जसप्रीत बुमराह आणि करुण नायर एकमेकांशी भिडले...रोहितने मात्र युद्धभूमीवरही घेतली मजा; बघा Viral Video

Jasprit Bumrah Karun Nair Fight: आयपीएल २०२५ चा सीजन अजून रंगदार होत आहे. २९ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) हे संघ एकमेकांविरुद्ध लढले. यावेळी टीम इंडियाचा शतकवीर करुण नायरने दिल्ली संघातून अचानक एन्ट्री घेतली. त्याने आपल्या स्फोटक खेळीने मुंबईला घायाळ करायचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, मुंबईतील सर्व शक्ती बुमराहशी शाब्दिक युद्ध करतानाही तो दिसला. दोघांमधील हा भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माची (Rohit shrama)  प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. 

नायरची दमदार फलंदाजी

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, दिल्लीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर एक विकेट गमावली. पण त्यानंतर करुण नायर आला, ज्याने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज बुमराहलाही सोडले नाही. नायरने बुमराहच्या 9 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा केल्या. या काळात त्याने बुमराहवर 3 चौकार आणि 2 षटकार मारले.

नायर आणि बुमराह एकमेकांशी भिडले

बुमराह आणि करुण नायर यांच्यात जोरदार वाद झाला. 48 धावांवर खेळणाऱ्या नायरने बुमराहवर एक शॉट मारला आणि दोन धावा काढल्या. दरम्यान, बुमराह त्याच्या मार्गात आला आणि दोघांमध्ये वाद झाला. ब्रेक दरम्यान दोघांमध्ये हा वाद बघायला मिळाला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने येऊन नायरशी बोलून प्रकरण शांत केले. या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहितने घेतली मज्जा 

करुण नायरने अवघ्या 40 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांसह 85 धावांची खेळी केली. रोहित शर्मा नायर आणि बुमराह यांच्यातील वादविवादाचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Read More