Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL: बुमराहला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, या इंग्लंडच्या क्रिकेटरकडून कौतूक

जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचं कौतूक

IPL: बुमराहला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, या इंग्लंडच्या क्रिकेटरकडून कौतूक

दुबई : जसप्रीत बुमराह आयपीएल २०२० मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आहे. त्याने दिल्ली विरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि या क्षणी तो या लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूही आहे. दिल्लीविरुद्ध त्याने ४ विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच ठरला.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने बुमराहला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हटलं आहे. बुमराहने दिल्लीविरूद्ध केलेल्या कामगिरीनंतर त्याने हे म्हटलं. बुमराहच्या गोलंदाजीमुळे मुंबईने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. वॉन म्हणाला की, 'मला असे म्हणायला काही हरकत नाही की, तो या क्षणी जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. शेवटच्या तीन सामन्यात त्याने १० विकेट घेत ४५ धावा दिल्या. टी-२० क्रिकेटमध्ये हे दिसत नाही.'

मायकेल वॉन याने पुढे म्हटले आहे की, बुमराह हा सध्या जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, असा युक्तिवाद कोणालाही करायला आवडणार नाही. त्याची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की तो थांबतो आणि शेवटच्या क्षणी बॉल फेकतो. त्याने स्टोनिसला बाद केलेला चेंडू खूप वेगवान होता आणि काही समजण्याआधी तो बॉल वेगाने आला.'

जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२० च्या हंगामात आतापर्यंत एकूण १४ सामने खेळले आहेत आणि २७ विकेट घेतल्या आहेत. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या क्वालिफाय सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या त्यात त्याने दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला शुन्यावर बाद केले. त्याने ४ ओव्हरमध्ये फक्त १४ दिले. तसेच एक ओव्हर मेडनही टाकली. त्याची गोलंदाजी देखील एक मोठे कारण होते ज्यामुळे मुंबईने सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला.

Read More