Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जसप्रीत बुमराह आशिया कप 2026 मधून बाहेर? टीम इंडियाला धक्का, फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह

Asia Cup 2026 : भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमधून जसप्रीत बुमराहला भारतीय संघाने रिलिज केलंय. आशिया कप 2026 विषयी चर्चा सुरु आहेच पण वर्क लोड मॅनेजमेंटमुळे बुमराह आशिया कप खेळणार की नाही याबाबत शंका आहे.   

जसप्रीत बुमराह आशिया कप 2026 मधून बाहेर? टीम इंडियाला धक्का, फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह

Asia Cup 2026 : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमधून बाहेर पडला आहे. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील तीन सामने खेळल्यावर टीम इंडियाने बुमराहला सीरिजमधून रिलीज केलं आहे. त्यानंतर आता जसप्रीत बुमराह पुढील कोणती आंतरराष्ट्रीय सीरिज खेळणार याविषयी चर्चा सुरु झालेली आहे.  

आशिया कपमध्ये खेळणार नाही बुमराह? 

आशिया कप 2026 चा वेळापत्रकाची घोषणा झाली असून 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. बुमराह या टूर्नामेंटमध्ये खेळेल की नाही यावर शंका आहे. याच कारण म्हणजे आशिया कप संपल्यावर एका आठवड्याच्या आत वेस्टइंडीज विरुद्ध टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. 

टेस्ट क्रिकेटसाठी आशिया कप सोडणार? 

आशिया कप 29 सप्टेंबर रोजी संपेल तर तर वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टेस्ट सामना हा 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा सामना हा 10 ते 14 ऑक्टोबर पर्यंत नवी दिल्लीत खेळवला जाईल.  तर नोव्हेंबर महिन्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्ट सामने सुद्धा आहेत. भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेची माहिती असलेल्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'हा एक अवघड निर्णय असेल पण बुमराहला टेस्ट क्रिकेट आवडतं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला सामन्यांमध्ये त्याच्या मदतीची गरज आहे. जिथपर्यंत टी 20 चा प्रश्न आहे, तो  जानेवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमध्ये खेळू शकतो. कारण आगामी टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. बुमराह जर आशिया कप खेळला तर समजून भारत फायनलमध्ये पोहोचणार, पण त्यामुळे वेस्ट इंडीज विरुद्ध सीरिजमध्ये त्यांचं खेळणं अवघड ठरू शकतं.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची दोन अनमोल रत्न, पण एकाला भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक व्हावं लागलं

 

टेस्ट क्रिकेटसाठी आशिया कप सोडणार? 

आशिया कप 29 सप्टेंबर रोजी संपेल तर तर वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टेस्ट सामना हा २ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा सामना हा 10 ते 14 ऑक्टोबर पर्यंत नवी दिल्लीत खेळवला जाईल.  तर नोव्हेंबर महिन्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्ट सामने सुद्धा आहेत. भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेची माहिती असलेल्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'हा एक अवघड निर्णय असेल पण बुमराहला टेस्ट क्रिकेट आवडतं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला सामन्यांमध्ये त्याच्या मदतीची गरज आहे. जिथपर्यंत टी 20 चा प्रश्न आहे, तो  जानेवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमध्ये खेळू शकतो. कारण आगामी टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. बुमराह जर आशिया कप खेळला तर समजून भारत फायनलमध्ये पोहोचणार, पण त्यामुळे वेस्ट इंडीज विरुद्ध सीरिजमध्ये त्यांचं खेळणं अवघड ठरू शकतं. आता बुमराहला आशिया कपमध्ये खेळवायचं की वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये हे चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना ठरवावं लागेल. 

Read More