IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये मुंबईचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचं पुनरागमन झालं असून त्याने मुंबई इंडियन्सचा सराव कॅम्प जॉईन केला आहे. बुमराह मागील काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता, मात्र आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengluru) यांच्यात 7 एप्रिल रोजी सामना खेळवला जाणार आहे यापूर्वी बुमराहच पुनरागमन झाल्याने मुंबई संघासाठी ही जमेची बाजू आहे. मात्र स्टार गोलंदाज दुखापतीतून परतल्यामुळे त्याला आरसीबी विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये लगेचच संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई इंडियन्सने रविवार 6 एप्रिल रोजी जसप्रीत बुमराह हा दुखापतीतून बरा होऊन संघाशी जोडला गेल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून मुंबईने ही माहिती दिली. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या सामन्या दरम्यान जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती, या दुखापतीमुळे बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला मुकावे लागले होते. बुमराहला बीसीसीआयच्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे रिहॅब करण्यात आले होते. येथून बुमराह हा आता पूर्णपणे फिट झाल्याने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात बुमराहचं पुनरागमन झालंय.
हेही वाचा : 'अरे हा तर फुसका बार निघाला,' धोनीची संथ खेळी पाहून नवज्योत सिंग सिद्धू संतापले, 'आता काय...'
MumbaiIndians PlayLikeMumbai TATAIPL pic.twitter.com/oXSPWg8MVa
Mumbai Indians (mipaltan) April 6, 2025
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी जसप्री बुमराहला 18 कोटींना रिटेन केले होते. 2013 पासून बुमराह हा मुंबई इंडियन्स सोबत खेळतोय. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून बुमराहचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले होते. त्याने मुंबई इंडियन्ससाठी 133 सामन्यात 165 विकेट घेतले आहेत. आयपीएल 2023 मध्ये दुखापतीच्या कारणामुळे बुमराह संपूर्ण सीजनमधून बाहेर होता.