IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. 20 ते 24 जून दरम्यान लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 विकेटने पराभव केला. त्यामुळे इंग्लंडने टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये 19 ओव्हर गोलंदाजी करून सुद्धा एकही विकेट घेणं शक्य झालं नाही. आता दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) बर्मिंघमला रवाना झालीये. तेव्हा पुढील टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार की नाही असा प्रश्न विचारण्यात येतोय.
लीड्स टेस्ट सामन्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने बुमराहच्या वर्कलोडबाबत मोठं वक्तव्य केलं. गंभीर यावेळी बुमराह विषयी बोलताना म्हणाला की, 'आम्ही ही योजना बदलणार नाही. मला वाटते की आमच्यासाठी, त्याचं वर्ल्ड लोड मॅनेजमेंट अधिक महत्वाचं आहे कारण अजून खूप क्रिकेट खेळायचं आहे आणि तो टेबलवर काय आणतो हे आम्हाला माहित आहे. म्हणूनच, दौर्यावर येण्यापूर्वी, तो तीन टेस्ट सामने खेळणार असा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याचे शरीर कसे आहे ते पाहूया. आम्ही ठरवले नाही की तो उर्वरित कोणते दोन सामने खेळणार आहे'.
भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 5 विकेट राखून विजय मिळवला.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट