Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Bumrah-Sanjana marriage: जसप्रीत बुमराह सध्या काय करतो?

लग्नानंतर 10 दिवसांत संजना आपल्या कामाला सुरुवात करताना दिसली मात्र बुमराह काय करतो हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Bumrah-Sanjana marriage: जसप्रीत बुमराह सध्या काय करतो?

मुंबई: लग्नानंतर 10 दिवसांतच संजना गणेशन पुन्हा एकदा आपलं काम करताना म्हणजेच अँकरिंग करताना सर्वांना दिसली. मात्र जसप्रीत बुमराह सध्या काय करतो असा प्रश्न अनेकांना आहे. भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीतून लग्नासाठी जसप्रीत बुमराहने माघार घेतली होती. त्यानंतर टी 20 आणि वन डे सामन्यात बुमराह दिसला नव्हता. त्यामुळे सर्वजण तो मैदानावर पुन्हा कधी दिसणार याची आतूरतेनं वाट पाहात होते. 

या प्रश्नचं उत्तर बुमराहनंच आता व्हिडीओ शेअर करून दिलं आहे. बुमराह सध्या वर्कआऊट करण्यात व्यस्त आहे. 9 एप्रिलपासून IPL सुरू होत आहेत. त्यासाठी बुमराहची तयारी सुरू आहे. एका बंद खोलीत बुमराह वर्कआऊट करत असल्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टावर शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

जसप्रीत बुमराह IPLमध्ये खेळताना दिसणार आहे. जसप्रीत बुमराह आपल्या टीमच्या हॉटेलमध्ये वजन उचलताना दिसला त्याने हा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टावर शेअर केला आहे. 'मी सध्या वजन उचलण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. या संघात रोहित शर्मा, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराहही संघातून खेळताना पाहायला मिळणार आहेत. 

 

Read More