IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यातील पाचव्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) इंग्लंडवर 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे सीरिज 2-2 अशा बरोबरीत सुटली. इंग्लंड दौरा बरोबरीत सुटण्यासाठी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या दोघांचं योगदान मोठं होतं. सिराजने सीरिजच्या शेवटच्या अर्ध्यातासात इंग्लंडच्या जवळपास 3 विकेट घेतल्या, त्यामुळे इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला गेला. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या रोमांचक विजयानंतर संघाला शुभेच्छा दिल्या, पण या दरम्यान त्याने सिराजचा कोणताही उल्लेख न केल्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला.
वर्कलोडमुळे जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी केवळ 3 सामने खेळणार हे हेड कोच गौतम गंभीरने आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार बुमराहने ओव्हल मैदानावरील शेवटचा सामना खेळला नाही, जो खऱ्या अर्थाने सीरिजचा निर्णायक सामना होता. मोहम्मद सिराजने या सामन्यात एकूण 9 विकेट घेतले, ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या विजयानंतर सिराजने म्हटले की, जर बुमराह इथे असता तर त्याला खूप आनंद झाला असता. बुमराहच्या गुडघ्याला इजा झाली त्यामुळे बुमराहला पाचव्या सामन्यापूर्वीच टीम इंडियातून रिलीज करण्यात आलं आणि तो भारतात परतला. इंग्लंड दौऱ्याबाबत जसप्रीत बुमराहने एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली. त्यात तिने लिहिले की, 'आम्ही एका अतिशय कठीण आणि रोमांचक टेस्ट सीरिजमधून चांगल्या आठवणी परत आणल्या आहेत. आता मी पुढील योजनेबद्दल विचार करत आहे'.
जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावरून ही पोस्ट केल्यावर तो आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. असं म्हटले जातंय की बुमराहने त्याच्या पोस्टमध्ये मोहम्मद सिराजचा कोणताही उल्लेख केला नाहीये. एका यूजरने तर असं देखील म्हटले की, बुमराह सिराजमुळे घाबरलाय का? मोहम्मद सिराजने इंग्लंड दौऱ्यात एकूण 23 विकेट घेतल्या. तो सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने या दौऱ्यात सर्वाधिक ओव्हर्स सुद्धा टाकले. सिराजचे फॅन्स त्याच्या फिटनेस आणि परफॉर्मन्सचं कौतुक करत असताना बुमराहमध्ये दोष शोधत आहेत.
हेही वाचा : मोहम्मद सिराजवरून पाकिस्तानात हाणामारी वेळ, LIVE शोमध्ये दरम्यान माजी क्रिकेटर्स भिडले, Viral Video
Is Bumrah insecure with Siraj ? pic.twitter.com/B7vrMM0QuY
Shah (Iamshah0000) August 5, 2025
Very interesting Insta post by Jasprit Bumrah.
Farrago Abdullah Parody (abdullah_0mar) August 5, 2025
No appreciation of Siraj.
No appreciation of Prasidh Krishna. No appreciation of Shubman Gill. pic.twitter.com/hon7yCsbcA
1. मोहम्मद सिराजने या सामन्यात किती विकेट घेतल्या आणि त्याला कोणता पुरस्कार मिळाला?
मोहम्मद सिराजने पाचव्या सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या आणि त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2. जसप्रीत बुमराहने पाचवा सामना का खेळला नाही?
जसप्रीत बुमराहला गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाचव्या सामन्यापूर्वीच भारतीय संघातून रिलीज करण्यात आले आणि तो भारतात परतला. तसेच, वर्कलोड व्यवस्थापनामुळे तो फक्त 3 सामने खेळणार होता, असे प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले होते.
3. जसप्रीत बुमराह ट्रोलर्सच्या निशाण्यावर का आला?
बुमराहने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मोहम्मद सिराजचा उल्लेख न केल्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. काही युजर्सनी असा दावा केला की बुमराह सिराजमुळे घाबरला आहे.