Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

INDvsSA:सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियासाठी वाईट बातमी

मंगळवारपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असल्यासे मानले जात आहे.

INDvsSA:सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियासाठी वाईट बातमी

शफ्स्ट्रम :  टाचेला झालेल्या दुखापतीमुळे भारताची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी मंगळवारी (१३, फेब्रुवारी) दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना खेळू शकणार नाही. मंगळवारपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असल्यासे मानले जात आहे.

तिच्या टाचेला झाली दुखापत

दरम्यान, बीसीसीआयने दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'झूलनच्या टाचेला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिचा एमआरआय करण्यात आला आहे.' मीडिया रिपोर्टमध्येही म्हटले आहे, 'बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूचे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार झूलनला विश्रांतीची गरज आहे. पुनरागमनावेळी ती तज्ज्ञांसबोबत चर्चा करेन आणि बंगळुरू येथे एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन सूरू करेन.'

मालिका जिंकने हेच लक्ष्य

भारतीय महिला क्रिकेट संघाने भलेही एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत शेवटचा सामना खेळताना पराभव स्विकारला. मात्र, त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर थोडाही परिणाम झाला नाही. आज त्यांची नजर दक्षिण अफ्रिकेविरूद्ध होत असलेल्या सामन्यावर आहे. पाच सामन्यांची ही मालिका जिंकने हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे ध्येय असणार आहे.

Read More