Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

तेजतर्रार झूलनचा महिला क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड

झूलनच्या या रेकॉर्डच्या आसपासही कुणी फिरकू शकलेलं नाही...

तेजतर्रार झूलनचा महिला क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्ये महिला टीम इंडियाची तेजतर्रार बॉलर झूलन गोस्वामी हिनं एक पाऊल टाकलंय. या मॅचमध्ये महिला टिम इंडियानं श्रीलंकेला पराभूत केलं. यामध्ये झूलननं दोन विकेट घेतल्या होत्या. यासोबतच झूलन महिला क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्वरुपांत 300 विकेट घेणारी पहिली महिला खेळाडू बनलीय. झूलननं नुकताच आपल्या टी-20 करिअरमधून निवृत्ती जाहीर केलीय. 

झूलनचा हा रेकॉर्ड यासाठीही खास आहे कारण झूलनच्या या रेकॉर्डच्या आसपासही कुणी फिरकू शकलेलं नाही... झूलननंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिटजपॅट्रिक आहे तिनं टेस्ट आणि वनडेमध्ये एकूण 240 विकेट घेतल्यात.

झूलननं वनडेमध्ये 205, टी-20 मध्ये 56 आणि टेस्ट मॅचमध्ये 40 विकेट घेतल्यात. 

Read More