Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू

भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षीय हा खेळाडू दुखापतीमुळे यापासून मुकला होता. पण गुरुवारी जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपली रँकिंग घोषित करेल तेव्हा श्रीकांत पहिल्या स्थानावर असेल. श्रीकांत पहिल्या स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू असणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल ही मार्च 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.

के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षीय हा खेळाडू दुखापतीमुळे यापासून मुकला होता. पण गुरुवारी जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपली रँकिंग घोषित करेल तेव्हा श्रीकांत पहिल्या स्थानावर असेल. श्रीकांत पहिल्या स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू असणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल ही मार्च 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.

प्रकाश पादुकोण 1980 मध्ये 3 टूर्नामेंट जिंकल्यानंतर पहिल्या स्थानावर पोहोचले होते. भारताकडून कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकवणारा श्रीकांत 76895 अंकासह रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचेल. श्रीकांतने 2017 मध्ये 4 सुपर सीरीज, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, फ्रांसमध्ये खिताब मिळवला. तो असं करणारा जगातील चौथा खेळाडू आहे. 2 नोव्हेंबर 2017 ला तो जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता.

Read More