Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शतकांचा रेकॉर्ड केन विलियम्सनच्या नावे; महान सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

NZ vs SA 2nd Test: न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने ( Kane Williamson ) त्याचा उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने दोन्ही डावात शतकं झळकावली होती. 

 शतकांचा रेकॉर्ड केन विलियम्सनच्या नावे; महान सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

NZ vs SA 2nd Test: न्यझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सिरीजवरही नाव कोरलं आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाज केन विलियम्सनच्या ( Kane Williamson ) शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या पुन्हा एकदा माजी कर्णधार केन विलियम्सनची ( Kane Williamson ) बॅट तळपली असून त्याने शतक ठोकलं आहे. 

केन विलियम्सन सध्या उत्तम फॉर्ममध्ये

न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने ( Kane Williamson ) त्याचा उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने दोन्ही डावात शतकं झळकावली होती. तर आता केनने दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या डावातही शतक झळकावलंय. या सामन्यात केनने 203 बॉल्समध्ये शतक पूर्ण केले. केनचं हे टेस्ट क्रिकेटमधील हे 32वं शतक होतं. या शतकासह त्याने महान सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे. शेवटच्या 11 टेस्ट डावांमध्ये फलंदाजीसह विलियम्सनचं ( Kane Williamson ) हे 7 वं शतक आहे.

सर्वात कमी डावांमध्ये ठोकलं 32 शतकं

केन विलियम्सनने ( Kane Williamson ) टेस्ट क्रिकेटमधील सर्वात कमी डावात 32 शतकं झळकावणारा फलंदाज ठरलाय. 172 डावांमध्ये त्याने ही शतकं झळकावली आहेत. यावेळी केनने स्टीव्ह स्मिथचा रेकॉर्ड मोडला आहे. स्मिथने 174व्या डावात 32वं शतक झळकावली आहेत. रिकी पाँटिंगने 176 तर सचिन तेंडुलकरने 179 डावात 32वं टेस्ट शतक पूर्ण केलंय. एक्टिव्ह खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत त्याने स्मिथची बरोबरी केलीये.

  • 172 डाव - केन विलियम्सन
  • 174 डाव - स्टीव्ह स्मिथ
  • 176 डाव - रिकी पाँटिंग
  • 179 डाव – सचिन तेंडुलकर
  • 193 डाव - युनूस खान

टेस्ट मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये केनची सर्वाधिक शतकं

टेस्ट सामन्याच्या चौथ्या डावात केन विलियम्सनचे ( Kane Williamson ) हे 5वं शतक आहे. चौथ्या डावात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानी पोहोचलाय. पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानच्या नावावरही चौथ्या इनिंगमध्ये 5 शतकं आहेत. तर सुनील गावस्कर, रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ आणि रामनरेश सरवन यांनी चौथ्या डावात प्रत्येकी 4 शतके झळकावली आहेत. तर गेल्या 4 डावांमध्ये केनचं हे तिसरं शतक आहे. 

Read More