Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

केन विलियम्सनच खणखणीत शतक, युवराज सिंहला सोडलं मागे, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

NZ VS SA : बुधवारी लाहोरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल खेळवली जात आहे. या सामन्याचा विजेता 9 मार्च रोजी दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना करेल. 

केन विलियम्सनच खणखणीत शतक, युवराज सिंहला सोडलं मागे, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

Kane Williamson : न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) सेमी फायनल सामन्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध दमदार शतक ठोकून अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. विलियम्सनने 94 बॉलमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध 102 धावांची खेळी केली. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 19,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. विलियम्सनने वनडेत सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत युवराज सिंहला मागे सोडलं आहे. 

बुधवारी लाहोरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल खेळवली जात आहे. या सामन्याचा विजेता 9 मार्च रोजी दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना करेल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामन्यात न्यूझीलंडने मोठा स्कोअर उभा केला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने याने साऊथ आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी 6 विकेट्स गमावून न्यूझीलंडने 362 धावा केल्या. साऊथ आफ्रिकेला न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये विजयासाठी 361 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडचे फलंदाज रचिन रवींद्र आणि केन विलियम्सन या दोघांनी शतकीय कामगिरी केली. यात रवींद्रने 108 धावा केल्या तर केन विलियम्सन 102 धावा करून शतक ठोकलं. 

हेही वाचा : द ग्रेट कॅप्टन रोहित शर्मा! भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचताच हिटमॅनने रचला इतिहास

 

रचिन रवींद्र आणि केन विलियम्सन या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी जवळपास 164 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर 34  व्या ओव्हरला 108 धावा करून बाद झाला. याच्या थोड्याचवेळाने केन विलियम्सनने शतक पूर्ण केलं. हे शतक त्याच्या वनडे कारकिर्दीतील 15 व शतक होतं. यासोबतच केन विलियम्सनने सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत युवराज सिंह, ऑयन मॉर्गन, तमीम इकबाल आणि पॉल स्टर्लिंग याला मागे सोडले. या चार क्रिकेटर्सच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 14-14 शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण :

केन विलियम्सन जेव्हा सेमी फायनलमध्ये उतरला तेव्हा क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मिळून त्याच्या नावावर एकूण 18,923 धावा होत्या, केनने या सामन्यात 77 धावा पूर्ण केल्या तेव्हाच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण करणारे केन विलियम्सन हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे. विलियम्सनने ता सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या यादीत डेविड वॉर्नर (18995) ला मागे सोडले. 

Read More