IPL 2025 SRH vs GT: आयपीएल (IPL 2025) मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी सुरूच आहे. पहिल्या सामन्यानंतर त्याच्या टॉप-3 फलंदाजांची बॅट चालेली नाही. हीच परिस्थिती गोष्ट रविवारी, ६ एप्रिल रोजी झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध पाहायला मिळाली. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशन घरच्या मैदानावर सपशेल अपयशी ठरले. या सामन्यादरम्यान फलंदाजांची सततची खराब फलंदाजी पाहून अखेर संघ मालक काव्या मारनला राग अनावर झाल्याचे तिच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (4-17) शानदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्सला 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात गुजरातने 16.4 षटकांत 3 गडी गमावत 153 धावा करून सामना जिंकला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने सिराजच्या पहिल्याच षटकात सलग दोन चौकार मारले, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वेगवान गोलंदाजाने त्याला बाद केले. हेडने या आयपीएलमध्ये अनुक्रमे 67, 47, 22, 4 आणि 8 धावा केल्या आहेत.
हेडनंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन हेही पाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यांचीही बॅट काही कमल करू शकली नाही. अभिषेकने 16 चेंडूत 18 धावा केल्या. या सिजनमध्ये त्याने अनुक्रमे 24, 6, 1, 2 आणि 18 धावा केल्या आहेत. या सामन्यात इशान किशनही अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर त्याला विशेष काही करता आले नाही. इशानने या मोसमात अनुक्रमे 106*, 0, 2, 2 आणि 17 धावा केल्या आहेत.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) April 6, 2025
या सामन्यादरम्यान सनरायझर्सची मालकीण काव्या मारन चांगलीच संतापलेली दिसली. संघाची कामगिरी बघून तिला राग अनावर झाल्याचे दिसून आले. अभिषेकच्या बाद झाल्याने ती निराश दिसली आणि तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काव्याने रागाने हातवारे केले, पण कॅमेरा पाहून भावनांवर नियंत्रण ठेवले.
हे ही वाचा: पाकिस्तानी खेळाडूचा संयम सुटला, चाहत्यावर केला हल्ला, कारण... गोंधळाचा Video Viral
Ruk jao bhai kya kar rahe ho
— TAUKIR (@iitaukir) April 6, 2025
Normal cricket khel lo ab
Kavya maran's reactions pic.twitter.com/O39QTMNgPc
Kavya Maran angry expression after Travis and Abhishek gets out
— CrickStudd (@CrickStudd) April 6, 2025
Mat khelo 300 ke liye#SRHvsGT #siraj #GTvSRH #kavyamaran #IPL2025 pic.twitter.com/JddNFP11ms
पहिल्या सामन्याशिवाय सनरायझर्सच्या फलंदाजांनी त्यांना आतापर्यंत सेलिब्रेशन करण्याची संधी दिलेली नाही.