SRH Owner Kavya Maran cried : सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये (IPL 2024 Final) मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी राखून हैदराबादचा (KKR vs SRH) पराभव केला अन् आयपीएलची ट्रॉफी उंचावली. हैदराबादने केकेआरच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकवले अन् मालकीन काव्या मारनला टेन्शन दिलं. संपूर्ण सामन्यात काव्या मारनला आनंद साजरा करता आली नाही. अखेर सामना संपल्यावर हिरमोड झालेली काव्या मारन (Kavya Maran Emotional) ढसाढसा रडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काव्या मारनच्या डोळ्यात पाणी
पहिल्या ओव्हरपासून हैदराबादला धक्क्यावर धक्के बसले. हैदराबादची परिस्थिती प्लेऑफमध्येच दयनीय झाली होती. त्यावेळी काव्या मारन हैदराबादच्या कामगिरीवर नाराज असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, हैदराबादने सामना गमावला अन् काव्या मारन भावूक झाली. कॅमेऱ्यासमोर काव्या मारने कोलकाताच्या खेळाडूंचं टाळ्या वाजवत स्वागत केलं अन् एसआरएसच्या खेळाडूंचं मनोबल उंचावलं. पण अखेर काव्याच्या अश्रूंचा बांध फुटला अन् तिच्या डोळ्यात पाणी आलं.
पाहा Video
Will never forgive KKR for making Kavya Maran Cry
— Mohit (@mohit12j) May 26, 2024
pic.twitter.com/wbswAh0Vrn
Kavya Maran was hiding her tears.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2024
- She still appreciated KKR. pic.twitter.com/KJ88qHmIg6
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादला 18.3 षटकांत 113 धावांत रोखलं. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या 26 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 52 धावांची खेळी केली आणि यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजच्या 32 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर केकेआरने 10.3 ओव्हरमध्येच सामना खिशात घातलाय.
कोलकाताने याआधी 2014 च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचं विजेतेपद पटकावलं होतं आणि आता 10 वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. याआधी केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.