Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आता विरोधकांची खैर नाही! भारतीय संघाने अचानक बदलला हेड कोच, 'या' स्टार खेळाडूचं नशीब चमकलं

Indian Football Team : भारताच्या पुरुष फुटबॉल संघाच्या हेड कोच पदी तब्बल १३ वर्षांनी भारतीय कोचची निवड करण्यात आलेली आहे. तेव्हा त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

आता विरोधकांची खैर नाही! भारतीय संघाने अचानक बदलला हेड कोच, 'या' स्टार खेळाडूचं नशीब चमकलं

Indian Football Team : भारताच्या फुटबॉल संघाच्या नव्या हेड कोचची घोषणा झाली आहे. जमेशपुर एफसीचे हेड कोच असलेल्या आणि ईस्ट बंगाल आणि मोहन बागानचे माजी मॅनेजर खालिद जमील यांना टीम इंडियानं नवीन कोच म्हणून नियुक्त केलं आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) ने याची घोषणा केली आहे. AIFF च्या  कार्यकारी समितिने माजी कर्णधार आईएम विजयनच्या अध्यक्षते खालील समितीच्या उपस्थितीमध्ये खालिद जमीलला (Khalid Jamil) भारतीय फुटबॉल संघाचा नवा हेड कोच म्हणून नियुक्त केलं आहे. विशेष म्हणजे 13 वर्षांनी भारतीय संघाचा हेड कोच म्हणून भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. यापूर्वी 2011-12 मध्ये सावियो मेडेइरा संघाचे हेड कोच बनवले होते. 

कोणाची जागा घेणार खालिद जमील?

भारतीय फुटबॉल संघाचे नवीन कोच बनलेले खालिद जमील हे स्पेनच्या मनोलो मार्केजची जागा घेतील. मनोलो मार्केजने मागच्या महिन्यात  पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघ फुटबॉलचा एकही सामना जिंकू शकली नाही. AIFF च्या टेक्निकल कमेटीने 22 जुलै रोजी राष्ट्रीय संघाचे निर्देशक सुब्रत पाल यांचा सल्ला घेऊन तीन लोकांची हेड कोच म्हणून नाव सुचवली होती, यात माजी हेड कोच स्टीफन कॉन्स्टेंटाइन, स्लोवाकियाई मॅनेजर स्टीफन टारकोविक आणि खालिद जमील यांच्या नावाचा समावेश होता. अखेर एक ऑगस्ट रोजी खालिद जमीलने भारतीय संघाचा हेड कोच म्हणून घोषणा केली आहे. 

कोण आहे खालिद जमील?

खालिद जमील याचा जन्म हा कुवैतमध्ये झाला असून तो 49 वर्षांचा आहे. खालिद जमीलने 2017 मध्ये आइजॉल फुटबॉल क्लबचा कोच असताना त्यांना आयलीगचा खिताब जिंकून दिला होता. खालिद जमील हा भारताचा माजी फुटबॉलपटू असून सध्या तो इंडियन सुपर लीगच्या जमशेदपुर एफसी संघाला कोचिंग देत होता. जमीलला मे महिन्यात AIFF ने लागोपाठ दुसऱ्या सीजनमध्ये AIFF पुरुष कोच ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित केलं होतं. हेड कोच असताना त्यांनी जमशेदपुर एफसीला 2023-24 च्या सीजनमध्ये सेमी फायनलमध्ये पोहोचवलं होतं. खालिद जमीलच्या हेड कोच कारकिर्दीत भारताचा पुरुष क्रिकेट संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

कधी पासून सुरु होणार भारतीय संघाचे सामने?

29 ऑगस्ट पासून भारतीय संघाचे सामने सुरु होणार आहेत. जिथे भारत ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे होणाऱ्या नेशन्स कप फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान ताजिकिस्तानशी सामना करेल. भारताचा हेड कोच म्हणून जमीलची ही पहिलीच स्पर्धा असेल. भारताला या स्पर्धेच्या गट ब मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या ग्रुपमध्ये भारत आणि ताजिकिस्तान शिवाय ईरान आणि अफगानिस्तान हे दोन संघ आहेत. 

Read More