Khushdil Shah Fight: पाकिस्तान क्रिकेटची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाकिस्तानी एकीकडे संघाला प्रत्येक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे. अगदी सगळ्याच मालिका गमावत आहे. तर दुसरीकडे त्यांचे खेळाडू संयम गमावत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांनी दावा केला आहे की खुशदिल शाहचे चाहत्यांशी जोरदार भांडण (Pakistan Cricket Board Breaks Silence Khushdil Shah vs Spectator) झाले.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना माउंट मौनगानुई येथे खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानला 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे पाकिस्तानने मालिका 0-3 ने गमावली. पण मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यानही एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूची चाहत्यांशी बाचाबाची झालेली बघायला मिळाले. हे प्रकरण इतके वाढले की सुरक्षा रक्षकाने या खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो शांत होण्यास तयार झाला नाही. या घटनेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पराभव आणि त्यानंतर चाहत्यांनी डिवचल्यामुळे हे भांडण झालं असावं असे वाटत आहे. वास्तविक, सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्या प्रतिक्रिया ऐकून खुशदिल शाह यांचा संयम सुटला. सीमेजवळील रेलिंगवरून उडी मारून तो चाहत्यांमध्ये पोहोचला. प्रकरण इतके वाढले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.
Chaotic scenes.
— Bhavesh Gujrati (@Bhaveshlivelife) April 5, 2025
Khushdil Shah went on to attack a fan after being verbally abused. Luckily, guards managed to stop him.
Pakistan lost 4-1 in the T20I series and 3-0 in the ODI series in New Zealand.#KhushdilShah #PAKvsNZ#PAKvNZ #NZvPAK #NZvsPAKpic.twitter.com/IVErQPukFO
खुशदिल शाह देखील T-20 मालिकेदरम्यान चर्चेत आला होता. त्यानंतर एका सामन्यादरम्यान फलंदाजी करताना त्याने न्यूझीलंडचा गोलंदाज फॉक्सला टक्कर मारली होती. त्यानंतर त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. त्याला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि त्याला तीन डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले.