नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगची किंग्स इलेवन पंजाब या टीमने ११ व्या एडिशनसाठी नवी जर्सी लॉंन्च केली. IPL-2018 ची सुरुवात ७ एप्रिलपासून होईल. किंग्स इलेवन पंजाब ही टीम आपली पहिली मॅच ८ एप्रिलला दिल्लीच्या डेअरडेविल्सविरुद्ध खेळेल.
जर्सी लॉन्चिंगला टीमचे मेंटर वीरेंद्र सेहवाग आणि कर्णधार रविचंद्रन अश्विन देखील उपस्थित होते. याप्रसंगी सेहवाग म्हणाला की, आमच्या खेळातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर आम्ही ते सर्व करण्याचा प्रयत्न करु जे आतापर्यंत केले नाही. मला पूर्ण आशा आहे की यावर्षी हा किताब आम्हीच पटकावू.
#NewSeasonNewJersey
— Mohit Burman (@imohitburman) March 13, 2018
Unveiling our new jersey for the season 2018, with @virendersehwag and @ashwinravi99 .@lionsdenkxip #LivePunjabiPlayPunjabi #KXIP @IPL #IPL2018 #IPL11 #REDFOREVER pic.twitter.com/NBVJKtWR4T
तर कर्णधार अश्विन म्हणाला की, वीरु मला पंजाबवरुन घेऊन आला आणि कर्णधार बनवले. मी आतापर्यंत पंजाबकडे दुसऱ्या नजरेने पाहिले आहे. मात्र आता मी त्याचाच एक भाग आहे. वीरूने सांगितल्याप्रमाणे आमचे लक्ष्य प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि किताब पटकावणे असेल.
आयपीलएलचे ऑक्शन चालू असताना प्रिती झिंटा अश्विनला टीममध्ये सामिल करण्यासाठी उत्सुक होती. आयपीलएलच्या ८ टीमपैकी ७ टीमचे कर्णधार फलंदाज आहेत. फक्त अश्विन एकटाच गोलंदाज आहे. तर व्येंकटेश प्रसाद किंग्स इलेवन पंजाबचे गोलंदाजीचे कोच आहेत.