Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 : 'मी काही बोललो तर वाद होईल...' होमग्राउंडवरील पराभवानंतर अजिंक्य रहाणे पिच क्यूरेटरबद्दल स्पष्टच बोलला

KKR VS LSG : कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने पिच क्युरेटरविषयी मोठे विधान केले. तसेच त्याने म्हटलं की, 'आता पीचबाबत मी काहीही बोललो तर वाद होईल'. 

IPL 2025 : 'मी काही बोललो तर वाद होईल...' होमग्राउंडवरील पराभवानंतर अजिंक्य रहाणे पिच क्यूरेटरबद्दल स्पष्टच बोलला

KKR VS LSG : मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Kolkata Knight Riders VS Lucknow Super Giants) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात केकेआरचा 4 धावांनी पराभव झाला. हा केकेआरचा होम ग्राऊंडवरील सलग दुसरा पराभव होता तर आतापर्यंत 5 पैकी 3 सामन्यात त्यांना पराभव मिळालेला आहे. या सामन्यानंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने पिच क्युरेटरविषयी मोठे विधान केले. तसेच त्याने म्हटलं की, 'आता पीचबाबत मी काहीही बोललो तर वाद होईल'. 

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा पुन्हा एकदा संघाचं होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्सच्या पीचबाबत निराश दिसला. संघाच्या स्पिनर गोलंदाजांना पीचकडून कोणतीही मदत मिळाली नाही. जेव्हा 'होम अ‍ॅडव्हान्टेज' चा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा रहाणेने आपले शब्द काळजीपूर्वक निवडले आणि म्हटले की त्याच्या कोणत्याही टिप्पणीमुळे 'वाद' निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा : लखनऊच्या गोलंदाजाने बदलली सिग्नेचर स्टाईल, यावेळी नोटबुक सेलिब्रेशन नाही तर थेट जमिनीवर....

अजिंक्य रहाणेने सामन्यानंतर म्हटले की, सर्वात आधी मी हे स्पष्ट करू इच्छितो की स्पिनर्सला कोणतीही मदत मिळालेली नाही. लखनऊने केकेआरला  विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिले होते. रहाणेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला परंतु तो निर्णय त्यांच्यावर उलटा पडला. कारण विरुद्ध संघाने केकेआरच्या गोलंदाजी समोर अतिशय सहज धावा केल्या आणि धावसंख्या 200 पार पोहोचवली. रहाणेने सांगितले की, 'त्यांनी बाउंड्रीचा खूप चांगला वापर केला आणि आमच्या गोलंदाजांनी सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले पण पूरन आणि मिचेल मार्शने मध्ये खूप चांगली फलंदाजी केली आणि त्यामुळेच ते मोठी धावसंख्या करू शकले. 

मी काही बोललो तर वाद होईल : 

होम अ‍ॅडव्हान्टेज विषयी विचारले असता, अजिंक्य रहाणे म्हणाले की, 'पाहा, विकेटबद्दल बरीच चर्चा झाली आहे. तर मी आता काही बोललो तर वाद होईल. रहाणेने ईडन गार्डन स्टेडियम क्यूरेटरवर सुजान मुखर्जीविषयी बोलताना म्हटले की, 'जे आमचे क्यूरेटर आहे, त्यांना आधीच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मला वाटतंय की ते या प्रचाराने खुश आहेत. होम अॅडव्हान्टेज विषयी तुम्हाला जे लिहायचंय ते तुम्ही लिहू शकता. जर मला काही बोलायचे असेल तर मी ते इथे बोलण्याऐवजी आयपीएलला कळवेन'. 

Read More