Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बंगळुरूचं कोलकात्यापुढे १७७ रन्सचं आव्हान

कोलकाता नाईडरायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या.

बंगळुरूचं कोलकात्यापुढे १७७ रन्सचं आव्हान

कोलकाता : कोलकाता नाईडरायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या. बंगळुरूकडून मॅक्कलम, विराट आणि एबी डिव्हिलयर्सला चांगली सुरुवात मिळाली पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. मॅक्कलमनं २७ बॉलमध्ये ४३, विराटनं ३३ बॉल्समध्ये ३१ आणि एबीनं २३ बॉल्समध्ये ४४ रन्स केल्या. तर मनदीप सिंगनं १८ बॉलमध्ये ३७ रन्स केल्या.

कोलकात्याच्या विनय कुमार आणि नितीश राणाला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. नितीश राणानं विराट कोहली आणि एबी डिव्हिलयर्सला आऊट केलं. तर पियुष चावला, सुनिल नारायण आणि मिचेल जॉनसनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा 

 

Read More