Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी कॅप्टन श्रेयस अय्यरचा मास्टर प्लॅन

कोलकाता टीमला अजूनही प्लेऑफची आशा, श्रेयस अय्यरने सांगितला मास्टर प्लॅन

प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी कॅप्टन श्रेयस अय्यरचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई पाठोपाठ आता कोलकाताही प्लेऑफमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीमध्येही कर्णधार श्रेयस अय्यरला प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा आहेत. मुंबई विरुद्धचा सामना 51 धावांनी जिंकल्यानंतर हा विश्वास अधिक वाढला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या टीममध्ये 5 मोठे बदल केले आहेत. 

मुंबई विरुद्धच्या सामन्यात श्रेयसने 5 मोठे बदल केले आहेत. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर,  वरुण चक्रवर्ती, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स यांना टीममध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. 

आरोन फिंच, बाबा इंद्रजीत, अंकुल रॉय, शिवम मावी आणि हर्षित राणा यांना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात श्रेयसने अनेक बदल केले. 

यावेळी कोलकाता टीम फुल्ल तयारीला लागली आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी करो या मरोचे सामने आहेत. प्लेऑफला पोहोचण्यासाठी अजून 4  सामने जिंकणं गरजेचं आहे. आता टीमने 12 पैकी 5 सामने जिंकले असून 7 गमवले आहेत. 

Read More