Athiya Shetty KL Rahul Baby Girl: सुनील शेट्टी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आई बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यानंतर या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
अथिया शेट्टीने 24 मार्चला संध्याकाळी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने मुलीची आई झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर ज्यामध्ये लिहिलं आहे, 'आम्ही एका मुलीचे पालक झालो आहोत...' अथियाची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ज्यावर चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
अथियाच्या या पोस्टवर अभिनेत्री कियारा अडवाणीनेही कमेंट केली. ज्यामध्ये त्याने अनेक हृदयाचे इमोजी पाहिला मिळतात. तर अर्जुन कपूरने लिहिलंय की, 'अभिनंदन मित्रांनो.' याशिवाय पंजाबी गायक जस्सी गिलनेही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अथियाच्या पोस्टला काही मिनिटांतच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अथिया शेट्टीने क्रिकेटपटू केएल राहुलशी 2023 मध्ये दोघांचेही लग्न मोठ्या थाटामाटात झाले. ज्यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्त्वे सहभागी झाली होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर, आता हे जोडपे एका गोंडस मुलीचे पालक झाले आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अथिया शेट्टीने 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती मुबारकां आणि मोतीचूर चकनाचूर मध्ये दिसली. पण कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. यानंतर अभिनेत्रीने अभिनयापासून स्वतःला दूर केले.