Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022: चुकीला माफी नाहीच; के.एल राहुलच्या त्या चुकीमुळे टीमवर पराभवाची नामुष्की

लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार के.एल. राहुलच्या एका चुकीमुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IPL 2022: चुकीला माफी नाहीच; के.एल राहुलच्या त्या चुकीमुळे टीमवर पराभवाची नामुष्की

मुंबई : 26 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरु झाला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार के.एल. राहुलच्या एका चुकीमुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सची स्थिती 15 ओव्हरमध्ये 4 बाद 91 अशी होती. त्यांना शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 68 रन्स जिंकण्यासाठी हवे होतं. यावेळी लखऩचा कर्णधार केएल राहुलने हुडाला त्याची तिसरी ओव्हर दिली. मात्र के. एल राहुलची हीच चूक त्याला फार महागात पडली आहे. 

हुडाने 16व्या ओव्हरमध्ये 22 रन्स दिले आणि इथूनच संपूर्ण सामना गुजरातच्या बाजूने गेला. राहुल तेवतियाने या ओव्हरमध्ये 1 चौकार, एक सिक्स आणि डेव्हिड मिलरनेही चौकार, एक सिक्स मारली.

राहुल तेवातियाने 24 बॉल्समध्ये 40 रन्स केले. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. 159 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 19.4 ओव्हरमध्ये राहुल तेवातियाने टीमला विजय मिळवून दिला. 

लखनऊ सुपर जाएंट्सकडून ऑफ स्पिनर दीपक हुडा 2 ओव्हरमध्ये केवळ 9 रन्स दिले होते. त्यामुळे कर्णधार के.एल राहुलने 16 वी ओव्हर हुडाच्या ताब्यात दिली. मात्र इथेच चूक झाली आणि हातातोंडाशी आलेला सामना लखनऊ सुपरजाएंट्सने गमावला.

Read More