IPL 2026 : सध्या भारताचा स्टार सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी करत आहे. मँचेस्टर टेस्टमध्ये राहुलने दुसऱ्या इनिंगमध्ये 90 धावा केल्या. तर दुसऱ्या टेस्ट सामन्यात केएल राहुलने शतक सुद्धा ठोकलं होतं. आता केएल राहुलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार आयपीएल 2026 पूर्वी केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हा संघ सोडणार असून नव्या संघाशी जोडला जाणार आहे. यासंदर्भात दोन्ही संघाची बोलणी सुद्धा सुरु झालेली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइटराइडर्सचा संघ केएल राहुलला आयपीएल 2026 साठी आपल्या संघात जोडू इच्छितो. केकेआरला नव्या सीजनसाठी नव्या कर्णधाराची प्रतीक्षा आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये केकेआरने ट्रॉफी जिंकली होती. पण 2025 मध्ये केकेआरला प्लेऑफमध्ये सुद्धा जागा मिळवता आली नाही. आयपीएल 2025 पूर्वी केकेआरने श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही, ज्यामुळे आयपीएल 2025 मध्ये अजिंक्य रहाणेला केकेआरचं कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण त्याच्या नेतृत्वात केकेआरचा परफॉर्मन्स ढासळला.
हेही वाचा : Ind vs Eng: लॉर्ड्समध्ये भारतासोबत सर्वात मोठा धोका! 30-35 ओव्हर्स जुना चेंडू देत गंडवलं; तो पराभव ठरवून?
कोलकाता नाइटराइडर्सने गेल्यावर्षी आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऑलराउंडर वेंकटेश अय्यरवर 23.75 कोटींची बोली लावून करारबद्ध केलं होतं. पण अय्यरवर लावलेला एवढा मोठा दावं त्यांच्यावर उलटा पडला. त्यांचा संघ या सीजनमध्ये फ्लॉप ठरला. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केलं. यापूर्वी तो लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सने 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राहुलला 14 कोटींना करारबद्ध केलं होतं. केएल राहुलने संघाचं नेतृत्व तर केलं नाही मात्र 500 हुन अधिक धावा केल्या. तेव्हा केएल राहुलला कोलकाता नाइटराइडर्स कर्णधारपद आणि 25 कोटींची ऑफर देऊन संघात समाविष्ट करू शकतो. यापूर्वी मुंबई इंडियन्सने सुद्धा आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पंड्याला ट्रेड करून आपल्या संघात घेतलं होतं. एवढंच नव्हे तर त्याला कर्णधारपद सुद्धा दिलं. त्याच प्रकारे केएल राहुलला सुद्धा केकेआर ट्रेड करून आपल्या संघात घेऊ शकतो.