IPL 2026 : आयपीएल 2025 संपून काहीच दिवस झालेत तोवर आता आयपीएल 2026 बद्दलचा रोमांच वाढू लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केएल राहुल पुढील सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग राहणार नाही. आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये त्याला 14 कोटींना दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) करारबद्ध केलं होतं, मात्र आता त्याला पुढील सीजनसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Superkings) या दोन संघांकडून आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. कोलकाता आणि चेन्नई हे दोन्ही संघ केएल राहुलला (KL Rahul) ट्रेड करून त्याला कर्णधारपद सुद्धा देण्यास तयार आहेत.
सध्या केएल राहुल हा दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. त्यामुळे राहुलला ट्रेड करायचं की नाही याबाबतचा निर्णय दिल्ली कॅपिटल्स घेईल. राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने इंग्लंड दौऱ्यात भारतासाठी शतकीय कामगिरी सह 500 हून अधिक धावा ठोकल्या आहेत. आता हे पाहणे महत्वाचं असेल की हा फक्त रोख रकमेचा व्यवहार असेल की दिल्ली कॅपिटल्स सीएसके किंवा केकेआरसोबत एखाद्या वरिष्ठ खेळाडूची देवाणघेवाण करू शकते.
कोलकाता नाइटराइडर्सने गेल्यावर्षी आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऑलराउंडर वेंकटेश अय्यरवर 23.75 कोटींची बोली लावून करारबद्ध केलं होतं. पण अय्यरवर लावलेला एवढा मोठा दावं त्यांच्यावर उलटा पडला. त्यांचा संघ या सीजनमध्ये फ्लॉप ठरला. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केलं. यापूर्वी तो लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सने 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राहुलला 14 कोटींना करारबद्ध केलं होतं. तेव्हा केएल राहुलला कोलकाता नाइटराइडर्स कर्णधारपद आणि 25 कोटींची ऑफर देऊन संघात समाविष्ट करू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने सुद्धा आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पंड्याला ट्रेड करून आपल्या संघात घेतलं होतं.
हेही वाचा : आता विरोधकांची खैर नाही! भारतीय संघाने अचानक बदलला हेड कोच, 'या' स्टार खेळाडूचं नशीब चमकलं
चेन्नई सुपर किंग्स आणि केएल राहुल यांच्यात जर ट्रेड झाला तर राहुल हा धोनीची परफेक्ट रिप्लेसमेंट ठरू शकेल. राहुल हा धोनी सारखाच मैदानावर कुल राहण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो संघाचं नेतृत्व सुद्धा करू शकतो आणि विकेटकीपिंगचा भार सुद्धा खांद्यावर घेऊ शकतो. धोनी येत्या काही वर्षात आयपीएलमधून निवृत्ती घेईल तेव्हा राहुल हा चेन्नईसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो असं क्रिकेट जाणकारांचं मत आहे. यापूर्वी धोनीची रिप्लेसमेंट म्हणून संजू सॅमसनचा विचार सुद्धा चेन्नई सुपरकिंग्स करत होती.