Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 Auction: बंगळुरू संघाचा कर्णधार कोण? MS Dhoni च्या जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर

विराट कोहलीनं RCB सोडल्यानंतर पुढचा कर्णधार कोण? MS Dhoni च्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

IPL 2022 Auction: बंगळुरू संघाचा कर्णधार कोण? MS Dhoni च्या जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर

मुंबई: विराट कोहलीने बंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. आता बंगळुरूच्या कर्णधारपदासाठी मोठी स्पर्धा आहे. कोण होणार बंगळुरूचा कर्णधार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या नावाची चर्चा आहे. 

तर एबी डिव्हिलियर्सच्या खांद्यावरही RCB ची कमान देण्याचा विचार सुरू असतानाच त्याने संन्सास घेण्याची घोषणा केली आहे. आता सर्वांनाच प्रश्न पडला आहे की बंगळुरूचा कर्णधार कोण होणार? यांचं उत्तर महेंद्रसिंह धोनीच्या जवळच्या व्यक्तीनं दिलं आहे.

 चेन्‍नई सुपर किंग्‍सचे माजी खेळाडू  एस ब्रदीनाथ यांनी बंगळुरू संघाला पुढचा कर्णधार कोण असणार याचं उत्तर दिलं आहे. बद्रीनाथ यांच्या मते के एल राहुलच्या खांद्यावर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाची कमान सोपवण्यात येईल. 

fallbacks

दुसरीकडे पंजाब किंग्स आपली संपूर्ण टीम बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता के एल राहुलला बंगळुरू संघाल कर्णधार होण्याची संधी आहे. तर के एल राहुलने आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी 14 व्या हंगामात केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्याच्यावर 20 कोटींची बोलीही लागण्याची शक्यता आहे.

आता डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर यांच्या शर्यतीत के एल राहुल विजयी होणार का? त्याच्याकडे बंगळुरूचं कर्णधारपद येणार की लखनऊ आणि अहमदाबादच्या कर्णधारपदाचा मान मिळणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Read More