IND vs SL 1st ODI: टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. टी-20 सिरीजनंतर आता रोहितच्या नेतृत्वाखाली वनडे सिरीज खेळवली जातेय. वनडेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने ऋषभ पंतच्या जागी के एल. राहुलला संधी देण्यात आली. तब्बल 7 महिन्यांनी के.एल राहुलने वनडे फॉर्मेटमध्ये कमबॅक केलं आहे. मात्र टीम इंडियामध्ये कमबॅक केल्यानंतर रोहित शर्मा क्रिकेटचा महत्त्वाचा रूल विसरून गेल्याचं पहायला मिळालं.
पहिल्या वनडे सामन्यात के.एल राहुलचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना राहुल क्रिकेटचा नियमच विसरून गेला. यावेळी मैदानावरील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये केएल राहुल रोहित शर्माला नियमाविषयी विचारताना दिसतोय.
वॉशिंग्टन सुंदरने फेकलेल्या बॉलने श्रीलंकेचा फलंदाज निसांका काहीसा गोंधळला. यावेळी बॉल त्याच्या मांडीच्या पॅडजवळून गेला, त्यानंतर अपीलही केलं गेलं. रिव्ह्यूबाबत रोहित शर्मा राहुलकडे गेला त्यावेळी राहुलने त्याला आयपीएलच्या नियमाबाबत विचारलं. संपूर्ण संभाषण स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. यावेळी के.एल राहुलने विचारलं की, 'IPL चा नियम आहे का?'
"IPL me wide bach jaata hai na, issi liye bol raha hai wo"
— 45. (@45Devote) August 2, 2024
KL Rahul to Rohit Sharma on Dube's appeal for down the leg catch. pic.twitter.com/n8fT4gJufl
आयपीएलमध्ये टीम वाइडसाठी रिव्ह्यू घेऊ शकत होती. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम नाहीये. यावेळी केएल राहुल रोहित शर्माला याची पुष्टी करण्यास विचारताना असताना.
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मात्र, एका टोकाकडून ओपनर पथुम निसांकाने 56 रन्सची शानदार खेळी केली. पण नंतर विकेट गडगडल्या. मात्र, सातव्या क्रमांकाचा फलंदाज ड्युनिथ वेल्लालाघे याने जबाबदारी स्वीकारली आणि ६५ बॉल्समध्ये ६७ रन्स करत टीमची लाज राखली. या खेळीमुळे श्रीलंकेची टीम 230 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.