Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

के एल राहुलचं टेन्शन वाढलं, घातक बॉलर टीममधून बाहेर

लखनऊकडून सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर टीममधून बाहेर, जाणून घ्या कारण

के एल राहुलचं टेन्शन वाढलं, घातक बॉलर टीममधून बाहेर

मुंबई : आयपीएलमधील 45 वा सामना दिल्ली विरुद्ध लखनऊ खेळवला जात आहे. या सामन्यात के एल राहुलने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. पण लखनऊ टीमने आपल्या टीममध्ये बदल केला आहे. 

लखनऊ टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मुंबई विरुद्ध खेळताना आवेश खानला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या मॅचमध्ये खेळणार नाही. या सामन्यात कृष्णप्पा गौतमला खेळण्याची संधी दिली आहे. 

आवेश खानला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो टीममधून बाहेर झाला आहे. आवेश खान दुखापतीमधून केव्हा बरा होईल माहीत नाही. मात्र तो या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे लखनऊचं टेन्शन वाढलं आहे. 

आवेशने आतापर्यंत 8 सामने खेळले असून 11 विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊकडून सर्वात जास्त विकेट्स घेणारा तो खेळाडू आहे. त्यामुळे या सामन्यात लखनऊला थोडा तोटा होऊ शकतो. 

लखनऊ टीम : क्विंटन डी कॉक, के एल राहुल, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, रवि बिश्नोई.

दिल्ली टीम : पृथ्वी शॉ, डेव्हिड वार्नर, मिशेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया.

Read More