Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Pandya Brothers ने खरेदी केलं 30 करोडचं आलीशान घरं, तब्बल 8 बेडरूमचा फ्लॅट

असं आहे पांड्या ब्रदर्सचं घर

Pandya Brothers ने खरेदी केलं 30 करोडचं आलीशान घरं, तब्बल 8 बेडरूमचा फ्लॅट

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्याने खूप कमी वेळात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. या दोन्ही भावांनी मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. तब्बल 30 करोड रुपयांचं आलीशान फ्लॅट खरेदी केलं आहे. हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कुणाल पांड्या यांनी चक्क 8 बेडरूमचं फ्लॅट खरेदी केलं आहे. 

पांड्या ब्रदर्सने कमी वेळात मिळवली वेगळी ओळख 

हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या लक्झरी लाईफ जगण्यासाठी ओळखले जातात. वर्ल्ड क्रिकेटने या दोन्ही भावांना एक वेगळी ओळख आणि संपत्ती मिळवून दिली. या भावांनी चक्क मुंबईत 3838 स्क्वेअर फूटाचं आलीशान असं घर खरेदी केलं. 

अपार्टमेंटमध्ये जिमपासून अगदी स्विमिंग पूलपर्यंत सारं काही 

डीएनएमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पांड्या ब्रदर्सचं हे आलीशान घर मुंबईतील रुस्तमजी पॅरामाऊंटमध्ये आहे. या सोसायटीत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी देखील राहतात. पांड्या ब्रदर्सच्या या अपार्टमेंटमध्ये जिम, गेमिंग झोन आणि एक प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील आहे. 

लवकरच मुंबईत शिफ्ट होणार पांड्या ब्रदर्स 

पांड्या ब्रदर्सच्या घरात एक प्रायव्हेट थिएटर आहे. या अगोदर हे दोन्ही भाऊ वडोदरा येथे राहत असतं. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ लवकरच आपल्या कुटुंबासोबत मुंबईत शिफ्ट होणार आहेत. पांड्या ब्रदर्स श्रीलंका दौऱ्या दरम्यान भारताच्या वनडे आणि टी 20 टीममध्ये सहभागी आहेत. कुणाल पांड्या सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे श्रीलंकेत आहे. आणि हार्दिक देखील त्यांच्यासोबत आहे. 

Read More